
सुशांत सावंत -
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकार कोसळण्याची वाट पाहावी. आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करण्यास सक्षम आहोत. आमच्या दोन्हीही पक्षात उत्तम समन्वय असल्याचं वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलं आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार ? असा प्रश्न विचारत विरोधकांनी राज्य सरकारवर टीकांचा भडीमार सुरु केला आहे. ((Maharashtra Cabinet Expansion))
अशातच आता मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार संबंधित विभागांच्या सचिवांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हे आदेश दिले आहेत यावरुन देखील विरोधक टीका करत आहेत. याच पार्श्वभूमिवर आता दरेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
पाहा व्हिडीओ -
ते म्हणाले, 'काम वेळेत होणे गरजेच आहे म्हणून मंत्र्यांचे आधिकार हे सचिवांना देण्यात आले आहेत. मविआच्या काळात सचिवांचे आधिकार काढून घेण्यात आले होते. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. मुख्यमंत्री कार्यरत आहे अस्तित्वात आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याची आवश्यकता नसल्यांचही ते यावेळी म्हणाले.
तसंच अजित पवार यांनी सरकार कोसळण्याची वाट पाहावी. आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करण्यास सक्षम आहोत. आमच्या दोन्हीही पक्षात समन्वय उत्तम आहे. तुम्हांला लवकरच मंत्रिमंडळ विस्तार पाहायला मिळेल असंही ते म्हणाले.
लवकरच, लवकरच म्हणतायत करणार कधी -
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकमाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. माध्यमांनी मंत्रिमंडळ विस्तार कधी करणार असा प्रश्न विचारला की हे दोघे लवकरच लवकरच म्हणतायत. अरे पण ते वेळ कधी येणार असं पवार म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.