विधानसभा बरखास्तीबाबत प्रश्न विचारल्यावर अजित पवार हसले, पत्रकारांना म्हणाले...

Ajit Pawar On Political Crisis In Maharashtra : आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे आणि सडेतोड तसेच थेट बोलण्याच्या स्वभावामुळे अजित पवार लोकप्रिय आहे.
विधानसभा बरखास्तीबाबत प्रश्न विचारल्यावर अजित पवार हसले, पत्रकारांना म्हणाले...
Ajit Pawar On Political Crisis In Maharashtra, Ajit Pawar NewsSaam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई: एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यार आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे. विधानसभा बरखास्त करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारलं असता त्यांनी अनपेक्षित प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे आणि सडेतोड तसेच थेट बोलण्याच्या स्वभावामुळे अजित पवार लोकप्रिय आहे. विधानसभा बर्खास्त करण्याबाबत अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असतान अजित पवारांनी हसतच पत्रकारांना उत्तर दिलं की, "काय तुम्ही? काय बातम्या चालवता...?" असं अनपेक्षित उत्तर देत त्यांनी पत्रकारांनाही काहीसं गोंधळात टाकलं आहे. (Ajit Pawar On Political Crisis In Maharashtra)

हे देखील पाहा -

अजित पवार पत्रकारांना म्हणाले की, "काय तुम्ही? काय बातम्या चालवता...?" नेहमीसारखी बैठक झाली. कसलं काय? राज्यात तिन्ही पक्षांचे सरकार आहे असं अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. एकीकडे राज्यात एवढ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. मुख्यमंत्री राजीनामा देण्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत अजित पवारांनी कसलंही टेंशन नसल्याप्रमाणे त्यांनी पत्रकारांना भासवलं. मात्र अजित पवारांच्या या हसण्यात आणि या उत्तराच्या मागे काही वेगळं कारण आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे मविआ सरकारने बोलावल्या बैठकीत राजकीय चर्चा झाली नसल्याचं मविआ नेते म्हणाले याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. (Ajit Pawar News in Marathi)

दरम्यान एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यार असतानाच एकनाथ शिंदेनी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी शिवसैनिक असून मी शिवसेनेतच (Shivsena) राहणार असं ते म्हणाले आहे. एका मराठी एका वृत्तवाहिनीला फोनद्वारे स्वतः एकनाथ शिंदेंनी माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्यासोबत शिवसेनेचे ४६ आमदार आहेत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व घेऊन पुढे जातोय. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. आमची रणनीती पुढे कळेलच असं शिंदे यांनी स्पष्टे केलं आहे. त्याचप्रमाणे अजय चौधरी गटनेते झाले याबाबत ते म्हणाले की, गटनेता निवडण्याची ती पद्धत नियमबाह्य आहे. गटनेता निवडण्यासाठी बहुमत लागते. याबाबत मी जास्त बोलणार नाही. तसेच आपण शिवसेनेतच आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आणि शिवसेनेतच राहणार असं ते म्हणाले आहेत. (Eknath Shinde Latest News)

Ajit Pawar On Political Crisis In Maharashtra, Ajit Pawar News
अहो, शिंदे दादा, परत या ना!; उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर

या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत खळबळ उडवून दिली होती. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष असून, जास्तीत जास्त सत्ता जाईल. ती परत येईल, असे ते म्हणाले होते. त्यानंतर काही वेळातच संजय राऊत यांनी ट्विट करून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू असल्याचे ट्विट केले. या ट्विटमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का? अशा शक्यतांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com