'मला खूप वेळा राजकारण सोडावंसं वाटतं; गडकरींच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

गडकरींच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते , विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी परखड भाष्य केलं आहे
Nitin gadkari and ajit pawar
Nitin gadkari and ajit pawar saam tv

मुंबई : सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम हा काही दिवसांपूर्वी नागपुरात (Nagpur) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य केलं होतं. 'आताचं राजकारण हे १०० टक्के सत्ताकारण आहे. मला खूप वेळा राजकारण कधी सोडावं असं वाटतं, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं. गडकरींच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते , विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी परखड भाष्य केलं आहे. (Ajit Pawar News In Marathi )

Nitin gadkari and ajit pawar
Ajit Pawar: राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; विरोधी पक्षनेते अजित पवार

राज्यातील सत्तानाट्यावर नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भाष्य केलं होतं. त्यावेळी देशासहित राज्यातील राजकारणावर देखील भाष्य केलं. गडकरी यांनी राज्यातील सत्तानाट्यावरून नाराजी व्यक्त केली होती. त्या वक्तव्यावरून अजित पवार यांना मुंबईतील पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता, अजित पवार म्हणाले, 'नितीन गडकरी यांच्यासारखी व्यक्ती याबद्दल बोलतात, त्यांच्या मनात अशा भावना येतात. याची राज्यातील सर्व नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे'.

तर राज्यातील अतिवृष्टीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पीक कुजून गेली आहेत. यातच राज्याती मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. अतिवृष्टी सुरू झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे ताबडतोब अधिवेशन बोलवून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज केली.

Nitin gadkari and ajit pawar
जनतेला जमिनीवरचा नेता हवा; गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला

काय म्हणाले होते नितीन गडकरी ?

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांचा अमृत महोत्सव कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की,' राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे समजून घेतलं पाहिजे. पण आताचं राजकारण हे १०० टक्के सत्ताकारण झालं आहे. त्यामुळे मला खूप वेळा राजकारण कधी सोडावं असं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com