...अजित पवारांनी राखले कार्यकर्त्याचे मन आणि घेतला चहाचा आस्वाद

बारामती- तुषार खलाटे याच्या फिरत्या चहा विक्री केंद्राचे उदघाटन केल्यानंतर चहाचा आस्वाद घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती- तुषार खलाटे याच्या फिरत्या चहा विक्री केंद्राचे उदघाटन केल्यानंतर चहाचा आस्वाद घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार- Milind Sangai

बारामती : कार्यकर्त्याचा आग्रह होतो आणि त्या आग्रहाला नाही म्हणणे दस्तुरखुद्द अजित पवार Ajit Pawar यांनाही शक्य होत नाही, त्याच्या फिरत्या सेंद्रीय गुळाच्या चहाच्या दुकानाचेही उदघाटन उपमुख्यमंत्री Deputy CM करतात आणि उभ्या उभ्या त्याच्या गुळाच्या चहाचा Tea आस्वादही ते घेतात. बारामतीत Baramati आज (ता. 25) घडलेला हा किस्सा. Ajit Pawar tested tea at party workers stall in Baramati

तालुक्यातील कांबळेश्वर येथील तुषार खलाटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आपला हक्क आपला व्यवसाय या उपक्रमाखाली फिरत्या चहा विक्रीच्या दुकानाची सुरवात केली आहे. आज महाआरोग्य अभियानाच्या निमित्ताने अजित पवार येणार होते. त्या वेळेस तुषार यांनी अजित पवार यांना आपल्या या छोट्याशा व्यवसायाचे उदघाटन तुम्ही करावे अशी इच्छा बोलून दाखवली.

क्षणाचाही विलंब न करता पवार लगबगीने त्याच्या फिरत्या दुकानाजवळ गेले, त्यांनी फीत कापून उदघाटन केले आणि त्याने दिलेल्या गुळाच्या चहाचा आस्वादही घेतला. तेवढ्या वेळात त्यांनी व्यवसाय व त्याच्याविषयीही चौकशी केली. Ajit Pawar tested tea at party workers stall in Baramati

बारामती- तुषार खलाटे याच्या फिरत्या चहा विक्री केंद्राचे उदघाटन केल्यानंतर चहाचा आस्वाद घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार
मुख्यमंत्री चिपळूणला; उपमुख्यमंत्री अजित पवार साता-यात

अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मध्यस्थाची गरज लागत नाही, ते सर्वांनाच सहजतेने उपलब्ध होतात व कार्यकर्त्यांचे मनही राखतात याचा प्रत्यय या छोट्याशा घटनेने आज पुन्हा एकदा सर्वांना आला. आपल्या दुकानाचे उदघाटन स्वताः अजित पवार यांनी केल्याचा आनंद तुषार याच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत होता. चांगला व्यवसाय करा अशा सदिच्छाही जाता जाता पवार यांनी त्याला दिल्या.

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com