'कोल्ह्याला द्राक्ष आंबट' चित्रा वाघ यांना खोचक टोला !

चित्रा वाघ यांनी भाजपा जॉईन केलं आणि त्यांची वाताहत झाली.
'कोल्ह्याला द्राक्ष आंबट' चित्रा वाघ यांना खोचक टोला !
'कोल्ह्याला द्राक्ष आंबट' चित्रा वाघ यांना खोचक टोला !SaamTV

मुंबई : चित्रा वाघ Chitra Wagh यांनी भाजपा जॉईन केलं आणि त्यांची वाताहत झाली. आपल्या बरोबरीने काम करणाऱ्या महिलांची वर्णी लागत आहे आणि आपली नाही. त्यामुळे त्यांना पश्याताप होत असल्याने त्या अशा वक्तव्यं करत आहेत अशी टीका विद्या चव्हाण Vidya Chavhan यांनी केली आहे. तसेच त्यांची उडी द्राक्षापर्यंत पोहचणार होती तशी परिस्थिती असताना त्यांनी भाजप जॉईन केलं आणि द्राक्ष तोंडात पडेपर्यंत त्याची वाताहत झाली. त्यामुळे कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी वाघ यांची अवस्था झाली असल्याचही चव्हाण म्हणाल्या. (Allegations by NCP leader against Chitra Wagh)

हे देखील पहा -

चित्रा वाघ यांनी महिला आयोग अध्यक्षपदाच्या नेमणूकी बाबत जे ट्विट केलं आहे ते बरोबर नाही. महिला आयोगाची नेमणूक झाली नसताना त्यांनी अशी विधान करणं अयोग्य आहेच तसेच रुपाली चाकणकर Rupali chakankar यांना शुर्पणखा ठरवणे हे न शोभणारे असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या NCP Leader विद्या चव्हाण यांनी केले आहे. महिला म्हणून चित्रा वाघ यांनी बोलतांना भान ठेवावे असा सल्ला देखील चव्हाण यांनी दिला आहे.

'कोल्ह्याला द्राक्ष आंबट' चित्रा वाघ यांना खोचक टोला !
"...म्हणून महाराष्ट्रभर MIM चे कार्यकर्ते करताहेत राष्ट्रवादीत प्रवेश"

'चित्रा वाघ ह्या आमच्या पक्षात असतांना लोकांना पैशासाठी ब्लॅकमेल Blackmail करायच्या. तसेच चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा (Chairperson of the Women's Commission) असतांना भाजप च्या आमदाराने एका महिलेवर अत्याचार केले होते. या महिलेला चित्रा वाघ यांनी तीन दिवस स्वतःच्या घरी ठेवत पैश्यांची मागणी केली होती.' असे गंभीर आरोप विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावरती केले आहेत. राज्यातील महिला अत्याचाराचे प्रश्न सुटावेत यासाठी आयोगाची नेमणूक करणे गरजेचे आहे. आणि अशा वेळी आरोप करणे चुकीचे असल्याचही चव्हाण म्हणाल्या.

शुर्पणखा रुपाली चाकणकर यांना म्हटलं नाही -

मी माझ्या मनातले व्यक्त केले. त्या पदावर कुणीही बसा. पण रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ Shurpanakha बसवू नका असे मी म्हणाले. मी काही शुर्पणखा रुपाली चाकणकर यांना म्हटलेले नाही असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. महिला आयोगाचे पद हे संविधानिक आहे. त्या पदावर जी कोण असेल ती फक्त रावणाची शुर्पणखा नसावी असे मला वाटतं असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.