ऐकीव गोष्टींवर अनिल देशमुखांवर केले 100 कोटी वसुलीचे आरोप- सिंग
ऐकीव गोष्टींवर अनिल देशमुखांवर केले 100 कोटी वसुलीचे आरोप- सिंगSaam Tv

ऐकीव गोष्टींवर अनिल देशमुखांवर केले 100 कोटी वसुलीचे आरोप- सिंग

फक्त ऐकीव माहितीवर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत.

मुंबई : परमबीर सिंग यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी ऐकलेल्या गोष्टींवर अनिल देशमुख यांच्या विरोधात वसुलीचे आरोप केले असल्याती माहिती त्यांनी चांदीवाल आयोगाला दिली आहे. कॅमेऱ्यासमोर बोलण्यास ते तयार नाहित, परंतु त्यांनी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून हे उत्तर दिले आहे. यावरुन असे दिसते की परमबीर सिंग यांनी 100 कोटी वसुलीचे जे आरोप केले त्याविषयी पुरावे नाहीत. फक्त ऐकीव माहितीवर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत. अनेक दिवसांपासून गायब असलेले परमबीर सिंग सध्या वकीलांमार्फत संवाद साधत आहेत. त्यांनी समोर यायला नकार दिला आहे.

ऐकीव गोष्टींवर अनिल देशमुखांवर केले 100 कोटी वसुलीचे आरोप- सिंग
दिग्दर्शिका रोशन बिंदरला ३७ लाखांच्या फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक...

दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केल्याच्या काही दिवसांनंतर परमबीर सिंग गायब झाले होते. त्यांना कोर्टाच्या वतीने अनेक नोटीसा पाठवण्यात आल्या पंरतु ते काही हजर राहिले नाहित. नंतर परमबीर सिंग यांनी फरार घोषित करण्यात आले आणि मग परमबीर सिंग भारतातच आहेत आणि त्यांनी वकिलामार्फत उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. यापुर्वीही त्यांनी आपल्याकडे अनिल देशमुखांविरोधात ठोस पुरावे नसल्याचे उत्तर दिले होते. काल मुंबई पोलिसांनी त्यांच्या जुहूतल्या घराच्या दरवाजावरती फरारची नोटीस चिटकवली होती. परमबीर सिंग यांनी कोर्टाला उत्तर देताना म्हणाले होते की माझ्या जिवाला मुंबई पोलिसांकडून धोका आहे.

परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना महाराष्ट्रातील गुन्हेगारी गुन्ह्यांमध्ये अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्याचवेळी पोलीस अधिकारी आणि खंडणी खोरांवर गुन्हे दाखल करून सर्वसामान्यांचा छळ होत असेल तर त्याचे काय होणार, याबाबत न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार, पोलीस महासंचालक (डीजीपी) संजय पांडे आणि सीबीआयला नोटीस बजावली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com