
>> संजय गडदे
मुंबई : बनावट चलनी नोटांच्या पाठोपाठ आता बनावट नाणी बाजारात आणण्याची तयारी काही समाजकंटकांनी केली होती. बनावट नाण्यांद्वारे नागरिकांसह शासनाची फसवणूक करण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई व दिल्ली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १० लाख किमतीची बनावट नाणी, कारसह एका आरोपीला अटक केली आहे. दिंडोशीच्या पुष्पानगर येथील वल्लभ ए विंग सोसायटीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामध्ये ही नाणी बनवण्याचा कारखाना चालवला जात होता. या कारखान्यावर दिल्लीच्या स्पेशल सेलने कारवाई करत पाच जणांना अटक केली. आरोपींच्या चौकशीतून ही टोळी मुंबईत देखील धार्मिक स्थळी खऱ्या नाण्यांच्या बदल्यात खोटी नाणी बाजारात आणत असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी जिग्नेश गाला (वय ४२ वर्षे) याला अटक केली. आरोपीविरुद्ध भादंवि कलम २३२,२३४,२३५,२४३,१२० (बी) अन्वये दिंडोशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी जिग्नेश गाला याच्या कारमधून पोलिसांनी सुमारे ९ लाख ४६ हजार रुपयांचा बनावट जुनी नाणी जप्त केली असून यात सहभागी असलेल्या इतर आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.