Pune: दुर्देवी! भीषण आगीत ऊसतोड कामगारांच्या तीन झोपड्या जळून खाक; लाखोंचे नुकसान

साखर कारखान्याने आग विझवण्यासाठी पाण्याचा टँकर पाठवल्याने आग नियंत्रणात आली त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली.
Pargaon News
Pargaon NewsSaamtv

Ambegaon: पारगाव ता.आंबेगाव येथील चिकगाई मळा रस्त्यावर असलेल्या ऊसतोडी मजुरांच्या झोपड्यांना लागलेल्या आगीत तीन झोपड्या जळून खाक झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या आगीत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्या आणि संसारउपयोगी साहित्याची मोठी हानी झाली आहे.. (Ambegaon)

Pargaon News
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार

पारगाव येथील भीमाशंकर साखर कारखाना लगत चिचगाईमळा रस्त्यावर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या पाचटापासून तयार केलेल्या झोपडयांना आग लागली. या सर्व झोपड्या आनशाबा खंडू चितळकर, अर्जुन नवनाथ क्षीरसागर तसेच किसन आनशाबा चितळकर (मूळ रा. पाथर्डी ) ऊसतोडणी मजुरांच्या होत्या. ज्यावेळी आग लागली तेव्हा ते सर्व तरुण सकाळी ऊसतोडणी मजूर ऊसतोडण्यासाठी शेतात गेले होते.

या आगीत आनशाबा चितळकर यांचे धान्य ,कपडे ,टिव्ही ,संसार उपयोगी वस्तू जनावरांचे खाद्य जळून खाक झाले. तसेच अर्जुन क्षीरसागर यांचे धान्य ,कपडे ,संसार उपयोगी वस्तू जळून जाऊन ३० हजार रुपययांचे नुकसान झाले.

Pargaon News
Thane News: इमारतीचे बांधकाम सुरु असताना ढिगारा कोसळला, दोन कामगारांचा मृत्यू

दरम्यान, भीमाशंकर साखर कारखान्याने आग विझवण्यासाठी पाण्याचा टँकर पाठवल्याने आग नियंत्रणात आली त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी विकास खोटे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com