अंबरनाथ बिल्डर गोळीबार प्रकरणाला कलाटणी, ज्याच्यावर गोळीबार झाला तोच निघाला आरोपी

प्रतिस्पर्ध्याला अडकवण्यासाठी रचला गोळीबाराचा डाव
अंबरनाथ बिल्डर गोळीबार प्रकरणाला कलाटणी, ज्याच्यावर गोळीबार झाला तोच निघाला आरोपी
Crime NewsSaam TV

अंबरनाथमध्ये बिल्डरवर झालेल्या गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. कारण ज्याच्यावर गोळीबार झाला, त्या बिल्डरने एका प्रतिस्पर्ध्याला अडकवण्यासाठी स्वतःहून गोळीबार करवून घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून यानंतर हा बिल्डर फरार झाला आहे.

अंबरनाथमधील कमरुद्दीन खान या बिल्डरवर २४ एप्रिल रोजी त्याच्या कार्यालयात गोळीबार झाला होता. अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगावमधील मुकूल पाल्म सोसायटीत कमरुद्दीन खान याचं ऑफिस आहे. याठिकाणी कमरुद्दीन बसलेला असताना खिडकीतून एका अज्ञात हल्लेखोराने २ गोळ्या झाडल्या होत्या. हा गोळीबार प्रतिस्पर्धी बांधकाम व्यावसायिक नियाज सिद्दीकी याने घडवून आणल्याचा आरोप कमरुद्दीन याने केला होता.

हे देखील पाहा -

याप्रकरणी पोलिसांनी कमरुद्दीन याच्या तक्रारीवरून अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद हुसेन उर्फ अल्लाबक्ष इसाक सय्यद आणि किसन उर्फ सुखविंदर यशवंत सिंग या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कमरुद्दीन यानेच स्वतःवर गोळीवर करवून घेतल्याचं समोर आलं. कमरुद्दीन यानं मोहम्मद हुसेन उर्फ अल्लाबक्ष इसाक सय्यद याच्या माध्यमातून किसन उर्फ सुखविंदर यशवंत सिंग याला बंदूक आणि दारुगोळा पुरवला आणि त्यानंतर त्याच्याकडून स्वतःवर गोळीबार करवून घेतला.

Crime News
बीडच्या RTO कार्यालयात बोगस कर पावत्या, एजंटवर गुन्हा दाखल

दरम्यान, दोन हस्तकांना पोलिसांनी बेड्या ठोकताच कमरुद्दीन हा मात्र फरार झाला आहे. कमरुद्दीन यांच्यासह अटक केलेला आरोपी मोहम्मद हुसेन उर्फ अल्लाबक्ष इसाक सय्यद हे दोघे अंबरनाथमधील आरपीआय नेते नरेश गायकवाड यांच्या हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी होते. मात्र नंतर त्यांची त्यातून सुटका झाली. आता पोलिसांकडून कमरुद्दीन याचा कसून शोध घेतला जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.