धक्कादायक: रिक्षातून न्यायला नकार; युवकावर चॉपरने वार; घटना CCTV मध्ये कैद

दोन महिन्यांपूर्वी एका रिक्षातून बदलापूरला न्यायला नकार दिल्याचा राग मनात धरून युवकाच्या डोक्यात चॉपरने वार केले आहेत.
Navi Mumbai Crime News
Navi Mumbai Crime News Saam TV

अंबरनाथ: दोन महिन्यांपूर्वी एका रिक्षातून बदलापूरला (Badlapur) न्यायला नकार दिल्याचा राग मनात धरून एका रिक्षाचालकाच्या डोक्यात चॉपरने वार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या (Ambernath) गायकवाड पाडा भागात कल्पेश पाटील हा तरुण राहतो. याच परिसरात राहुल गायकवाड आणि चिकू बाविस्कर हे दोन गावगुंड राहतात.

सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कल्पेश हा त्याच्या मित्रांसोबत रात्री जेवण करून परिसरात फिरत असताना राहुल गायकवाड आणि चिकू बाविस्कर हे दोघे दुचाकीवरून तिथे आले. यापैकी चिकू बाविस्कर याने कल्पेशच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. तर राहुल गायकवाड याने त्याच्याजवळील चॉपरने कल्पेश याच्या डोक्यात दोन वार केले.

Navi Mumbai Crime News
शाळेकडे जाण्यासाठी रस्त्याची मागणी करणाऱ्या शिक्षकास शेतकऱ्यांकडून मारहाण

यापैकी एक वार कल्पेशच्या डोक्यात बसला, तर दुसरा वार त्याने हातावर झेलला. यानंतर राहुल आणि चिकू या दोन गावगुंडांनी कल्पेशच्या घरी जाऊन त्याच्या दुचाकी आणि रिक्षाचीही तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, ही मारहाण झाल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. कल्पेश याने २ महिन्यांपूर्वी राहुल याला रिक्षातून बदलापूरला न्यायला नकार दिला असल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवाय किरकोळ कारणावरून चॉपरने हल्ला केल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे

पाहा व्हिडीओ -

या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या राहुल आणि चिकू यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वी अंबरनाथच्या पालेगाव भागात काही गावगुंडांनी उधारी मागितली म्हणून हॉटेलच्या मॅनेजरला मारहाण केली होती. त्या प्रकरणातही राहुल गायकवाड याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं अशा गुंडांना पोलिसांनी जरब बसवण्याची आवश्यकता आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com