Viral Video : अंबरनाथमध्ये मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा
Viral Video : अंबरनाथमध्ये मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणाSaam Tv

Viral Video : अंबरनाथमध्ये मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा

तासभर धिंगाणा घालून तरुणी पसार

अंबरनाथ - अंबरनाथमध्ये एका मद्यधुंद तरुणीने भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तरुणीने रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ केली. अखेर तासाभराच्या तमाशानंतर ही तरुणी तिच्या मित्रासोबत त्या भागातून निघून गेली.

Ahmednagar: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंवर विनयभंगाचा गुन्हाअंबरनाथ पूर्व भागातील गोविंद पूल ते लोकनगरी या दरम्यान झालेल्या नवीन रस्त्यावर हा संपूर्ण प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी म्हणजेच २ सप्टेंबर रोजी रात्री एक तरुण आपल्या परिवारासह कारने या रस्त्यावरून जात होता. यावेळी अचानक एक तरुणी गाडीसमोर आली आणि शिवीगाळ करू लागली. त्यामुळे या तरुणाने त्या तरुणीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी पूर्णपणे नशेत असल्यामुळे काही ऐकायला तयार नव्हती.

Viral Video : अंबरनाथमध्ये मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा
Ahmednagar: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंवर विनयभंगाचा गुन्हा

इतक्यावरच न थांबता या तरुणीने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या आणखी काही नागरिकांना शिवीगाळ केली. अखेर तासाभराच्या तमाशानंतर ही तरुणी तिच्या एका मित्रासोबत पसार झाली. मात्र हा संपूर्ण धिंगाणा मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून या तरुणीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा प्रकार तासभर सुरु असतानाही पोलीस मात्र तरुणी निघून गेल्यानंतर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com