Ambernath: विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली; मोठा अनर्थ टळला

पोलीस घटनास्थळी दाखल, बस बाजूला करण्याचं काम सुरू
Ambernath School Bus Accident
Ambernath School Bus AccidentSaam Tv

अंबरनाथ - विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस (School Bus) उलटली आहे. अंबरनाथमधल्या ग्रीन सीटी संकुल परिसरात हा अपघात (Bus Accident) झाला. आज ६.४५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्कूल बसमध्ये १७ ते १८ विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.

Ambernath School Bus Accident
Santosh Bangar Update : आमदार बांगर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गुन्हा दाखल

मात्र सुदैवाने यात जिवितहाणी झाली नाही बस मधील सर्व विदयार्थ्यां सुखरुप असल्यामुळे पालकांनी सुटकेचा श्वास सोडला. सर्व विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून घरी पाठवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून क्रेनच्या मदतीने पलटी झालेली स्कूल बस हटवण्यात आली.

या अपघातामुळे स्कूल बसची वाहतूक करणाऱ्यांवर पुन्हा एकदा सवाल उपस्थित केले जात आहे. या अपघातामुळे शाळेत मुलांना आता स्कूल बसने पाठवावं की नाही, असा प्रश्न आता पालकांसमोर उभा ठाकला आहे. या अपघातानंतर स्कूल बसचा चालक आणि मालक यांच्यावर संकुलातील लोकांनी संताप व्यक्त केला. चालकाच्या बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळे हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा अपघात झाला त्यावेळी काही स्थानिक लोक आणि स्कूल बस चालकांमध्ये बाचाबाचीही झाली.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com