Ambernath: सोसायटीच्या पाण्याच्या वादातून सदस्यावर प्राणघातक हल्ला

सोसायटीच्या पाण्याच्या वादातून सोसायटीतच राहणाऱ्या एका सदस्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना
Ambernath: सोसायटीच्या पाण्याच्या वादातून सदस्यावर प्राणघातक हल्ला
Ambernath: सोसायटीच्या पाण्याच्या वादातून सदस्यावर प्राणघातक हल्लाअजय दुधाणे

अंबरनाथ : रागाच्या भरात माणसं काही देखील करु शकतात. अगदी एकमेकांच्या जीवावर देखील उठू शकतात. पण यातून समस्या सुटणार नाही. उलट त्याने भविष्यात येणाऱ्या अडचणी आणखी वाढतील. यामुळे संयमाने परिस्थिती हाताळायला हवी. पण सध्याच्या काळात संयम फार कमी माणसांकडे दिसतो. संयम सुटल्यामुळे फार मोठे नुकसान होतं. त्याचा प्रत्यय अंबरनाथ शहरात पाहायला मिळाला आहे.

हे देखील पहा-

अंबरनाथमध्ये सोसायटीच्या पाण्याच्या वादातून सोसायटीतच राहणाऱ्या एका सदस्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. संबंधित घटना ही अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सबर्बिया या उच्चभ्रू सोसायटीत आज सकाळच्या १० वाजेच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात सोसायटीचे सदस्य राकेश पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

Ambernath: सोसायटीच्या पाण्याच्या वादातून सदस्यावर प्राणघातक हल्ला
शिवसेनेची दादागिरी! उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्यानं मारहाण

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कृष्णा रसाळ आणि त्यांच्या २ मुलांनी हल्ला केल्याची माहिती आता समोर आली आहे. हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या हल्ल्याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलीस लवकरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतील आणि या घटनेत ज्यांची चुकी आहे त्यांच्यावर कारवाई करतील, अशी आशा काही स्थानिकांनी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.