Amit Thackeray Letter : अमित ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांकडे केली पोलीस बांधवांच्या मनातली मोठी मागणी

अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पोलीस बांधवांना बोनस मिळावा अशी मागणी केली आहे.
Amit Thackeray
Amit Thackeray saam tv

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा, असं त्यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी दिवाळीनिमित्त (Diwali 2022) पोलीस बांधवांना बोनस मिळावा अशी मागणी आपल्या पत्रातून केली आहे.

आपल्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या पोलिसांना पुरेशा सुट्ट्या देखील मिळत नाही. तासंतास न थकता आपल्यासाठी काम करणाऱ्या पोलीस बांधवांची दिवाळी उत्साहात आणि आनंदात साजरी व्हावी यासाठी त्यांना बोनस मिळावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे. (Latest News Update)

Amit Thackeray
Raj Thackeray Letter: राज ठाकरे यांचं आणखी एक पत्र, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अमित ठाकरे यांचं पत्र

महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यात आपले पोलीस बांधव दिवस-रात्र एक करतात. तुमच्या माझ्यासह राज्यातील सर्व नागरिक सणासुदीच्या दिवसांत सुट्टी घेऊन कुटुंबीय तसंच मित्रमंडळीसह जे काही आनंदाचे क्षण अनुभवतात, ते याच पोलिसांच्या अविरत सुरक्षा सेवेमुळे. अतिमहत्वाची शासकीय सेवा नोकरी म्हणून पोलीस बांधव ना युनियन करू शकतात, ना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना पाच दिवसांचा आठवडा असतो, ना त्यांना पुरेशा सुट्ट्या मिळतात. कामाचे तास तर सर्वात जास्त १२ ते १५ तास! पोलीस बांधवांच्याच म्हणण्यानुसार, इतर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा त्यांना एका वर्षात तब्बल ७६ दिवस अतिरिक्त काम करावे लागते!

Amit Thackeray
Cabinet Decision : शिंदे-फडणवीस सरकारचे मोठे निर्णय; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, तर राजकीय सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेणार

हे सगळं आज सांगण्याचं कारण इतकंच की, पुढच्या आठवड्यात दिवाळी साजरी करताना आपल्या प्रत्येकाच्या घरात जेव्हा कंदील आणि पणत्या लागतील, तेव्हा पोलीस बांधव डोळ्यात तेल घालून गस्त देत असतील... फटाके वाजवताना कुठे कुणी लहान मुलगा भाजला तर त्याला रुग्णालयात दाखल करत असतील... पोलीस बांधव आपल्यापैकीच आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल, हे एक समाज म्हणून आपण विसरूनच गेलोय.

माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की, गेल्या अनेक वर्षापासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी. पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com