Amit Thackeray : अमित ठाकरेंची मिश्किल टिप्पणी, गृहमंत्रिपद मिळाले तर...

मनसेला मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, त्यावर अमित ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.
Amit Thackeray Visits Kalyan Dombivli and Ambernath
Amit Thackeray Visits Kalyan Dombivli and AmbernathSAAM TV

कल्याण/ अंबरनाथ: राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना, त्याबाबत अमित ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. गृहमंत्रिपद मिळाले तर, सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू, असे अमित ठाकरे अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितले. तसेच गृहमंत्रिपदाची ऑफर हे वृत्त चुकीचे असल्याचे मी याआधीच स्पष्ट केले आहे, असेही ते म्हणाले. (MNS Amit Thackeray)

Amit Thackeray Visits Kalyan Dombivli and Ambernath
Photos: अमित ठाकरे यांना भेटायला विद्यार्थ्यांची झुंबड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा महासंपर्क दौरा सुरू आहे. ते ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांनी काल, शुक्रवारी अंबरनाथमध्ये माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी गृहमंत्रिपदाच्या ऑफरबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. मनसेला (MNS) मंत्रिपद मिळणार असल्याची सध्या राजकीय वर्तुळात आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर अमित ठाकरे यांनी उत्तर दिले. गृहमंत्रिपद देणार असतील तर, सत्तेत सहभागी होऊ, पण ते देत नाहीत, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

Amit Thackeray Visits Kalyan Dombivli and Ambernath
Aaditya Thackeray : "राजीनामा देण्याची हिंमत पाहिजे", आदित्य ठाकरे | SAAM TV

दरम्यान, अमित ठाकरे यांनी आज, कल्याणमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या दौऱ्याची सांगता डोंबिवलीत होणार आहे. आज त्यांनी कल्याणमधील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी औपचारिक गप्पा मारल्या. त्यावर तुम्हाला आताच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले तर आवडेल का, असं विचारण्यात आले. त्यावर त्यांनी हसत उत्तर दिले. मला राज ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल, असे ते म्हणाले.

अमित ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले...

गृहमंत्रिपदाच्या ऑफरवर मिश्किल टिप्पणी केल्यानंतर अमित ठाकरे यांनी आज, याबाबत स्पष्टच भूमिका मांडली. गृहमंत्रिपदाची ऑफर असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे मी प्रसारमाध्यमांना अनेकदा स्पष्टपणे सांगितले आहे. गृहमंत्रिपद मिळाले तर सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू, हे मी थट्टेत बोललो होतो. अनौपचारिक गप्पांमधील विनोद समजून घ्यायला हवेत, असे अमित ठाकरे म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com