'शेर शिवराज'च्या दिग्दर्शकाच्या 'त्या' पोस्टवर भडकले अमोल कोल्हे; जाणून घ्या काय आहे प्रकरण

खासदार कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर करुन आक्षेप घेतला आहे.
'शेर शिवराज'च्या दिग्दर्शकाच्या 'त्या' पोस्टवर भडकले अमोल कोल्हे; जाणून घ्या काय आहे प्रकरण
Amol KolheSaam Tv

मुंबई: दोन दिवसापूर्वी शेर शिवराय या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे खासदार अमोल कोल्हे त्या पोस्टवर भडकले आहेत. खासदार कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर करुन आक्षेप घेतला आहे. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राग व्यक्त केला आहे.

'एका दिग्दर्शकाने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यात त्यांचा हेतू सिनेमाचं प्रमोशन करणं हा असेल. पण माझा त्या कलाकृतीशी कोणताही संबंध नसताना अप्रक्षरित्या त्या पोस्टमध्ये माझं नाव घेण्यात आलं. हा उल्लेख आक्षेपार्ह पद्धतीने करण्यात आला म्हणून मी पोस्ट करणं मला गरजेचं वाटतं. अनेकदा अशा गोष्टींकडे कानाडोळा केला पाहिजे पण वारंवार जेव्हा एक गोष्ट घडते तेव्हा ते खोटे आरोपही खरे वाटू लागतात.' असं अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले आहेत.

दिग्पाल लांजेकर यांची पोस्ट काय होती?

दिग्पाल लांजेकर यांच्या फेसबुकवर 'शेर शिवराज' सिनेमाचं कौतुक करणारी एक पोस्ट शएअर करण्यात आली होती. ही पोस्ट अमोल कोल्हे यांच्याविरोधात होता. 'टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि शंभूराजे म्हणजे मीच अशी कोल्हेकुई बंद करून शेर शिवराज हे असे असतात हे सिद्ध करणारा चिन्मय मांडलेकरांचा जबरदस्त अभिनय असलेला सिनेमा..' असं यात म्हटले होते. यावर अमोल कोल्हे यांनी आक्षेप नोंदवला आहे.

अमोल कोल्हेंची पोस्ट काय?

खासदार अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ (Video) शेअर करुन आक्षेप नोंदवला आहे. मालिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज मीच तो असं समजणारा आणि त्यासोबतच माझ्या आडनावाचा वापर करून आक्षेपार्हरितीने अनेक गोष्टी करण्यात आल्या आहेत. मी माझ्या प्रत्येक व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तरीही माझ्या विरोधात पोस्ट लिहिल्या जात असतील तर हे वाईट आहे. अस लिहून माझी रेषा मोठी हे दाखवण्यासाठी दुसऱ्याची रेषा पुसून टाकण्याचा हा प्रयत्न सुरु असल्याचे दुर्देवी असून ही माझी संस्कृती नसल्याचे कोल्हे म्हणाले आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांच्या पोस्टनंतर सिनेमाचे दिग्दर्शत दिग्पाल लांजेकर यांनी डॅा. अमोल कोल्हेंची (Amol Kolhe) माफी ही मागितली आहे.

'ही पोस्ट माझ्या एका चाहत्याने केली होती. अनेक चाहते शेर शिवराजच्या प्रदर्शनानंतर पोस्ट शेअर करत होते, टॅग करत होते. यात अनावधानाने सोशल मीडिया टीमकडून ही पोस्ट शेअर केली. पण जेव्हा हे लक्षात आले तेव्हा काही मिनिटांत आम्ही ही पोस्ट डिलीट केली आहे. पण तेवढ्यात कोणीतरी स्क्रीनशॉट काढून त्यांच्यापर्यंत पोहोचवली असावी. हे आमच्याकडून जाणीवपूर्वक झालेलं नाही. मी त्यांची माफी मागतो, असं दिग्दर्शत दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.