नारायण राणेंच्या इशाऱ्यानंतर शरद पवार यांचा जुना व्हिडिओ व्हायरल

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे.
नारायण राणेंच्या इशाऱ्यानंतर शरद पवार यांचा जुना व्हिडिओ व्हायरल
Narayan Rane, Sharad PawarSaam Tv

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल, असा इशारा राणे यांनी दिला आहे. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर शरद पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधून बंडखोर आमदारांना इशारा दिला होता. बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पवारांनी दिला होता.

Narayan Rane, Sharad Pawar
आमदारांच्या केसालाही धक्का लावला तर..; नारायण राणेंचा शरद पवारांना इशारा

राष्ट्रवादीचे आमदार अमेल मिटकरी यांनी ट्विट करुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. 'धमकीविरांसाठी पवार साहेबांचा मोलाचा सल्ला' असं ट्विट मिटकरी यांनी केले.

Narayan Rane, Sharad Pawar
कोणाला घाबरवताय, तुमच्या असल्या धमक्यांना भीक घालत नाही - एकनाथ शिंदे

आमदारांच्या केसालाही धक्का लावला तर..; नारायण राणेंचा शरद पवारांना इशारा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधून बंडखोर आमदारांना इशारा दिला होता. बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पवारांनी दिला होता. त्यानंतर आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

नारायण राणे यांनी ट्विटरवर पवार यांच्यावर टीका करताना म्हटलं, माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत,'सभागृहात येऊन दाखवा',ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल. आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे. त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत.

काही जणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे.नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही. तसंच राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत तुमचे (शिवसेना)किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा, असा घणाघात राणे यांनी शिवसेनेवर केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com