सदाभाऊ, म्हणूनच फडणवीसांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय; अमोल मिटकरींचा टोला

सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोत यांच्यावर टीका केली आहे.
सदाभाऊ, म्हणूनच फडणवीसांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय; अमोल मिटकरींचा टोला
Sadabhau Khot/ Amol MitkariSaam TV

मुंबई : विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवार देण्यात आले होते. मात्र, अखेरच्या क्षणी भारतीय जनता पक्षाचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपाकडून ५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. (Vidhan Parishad Election)

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोत यांच्यावर टीका केली आहे. याबाबत मिटकरी यांनी ट्विट केलं आहे.

'सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणुनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिला आहे. मात्र, आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही. भाऊ त्या फडणिसांना सांगा, म्हणावं, "म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय. आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसलं."असं ट्विट करत मिटकरींनी (Amol Mitkari) सदाभाऊ खोत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक २० जून रोजी होणार असून आज ऐनवेळी सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला, तर राष्ट्रवादीच्या (NCP) शिवाजीराव गर्जे यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्यामुळे आता विधानरपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.

विधान परिषदेसाठी निवडणुक लढविणारे ११ उमेदवार पुढीलप्रमाणे -

भाजपा - प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे

राष्ट्रवादी काँग्रेस - रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे

शिवसेना - सचिन अहिर, आमश्या पाडवी

काँग्रेस - भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com