इस शहर में... मुंबईच्या खड्ड्यांवरुन अमृता फडणवीसांची खास शैलीत टीका

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक फोटो ट्विट करत आपल्या खास शैलीत प्रशासनावर निशाणा साधला आहे.
इस शहर में... मुंबईच्या खड्ड्यांवरुन अमृता फडणवीसांची खास शैलीत टीका
इस शहर में... मुंबईच्या खड्ड्यांवरुन अमृता फडणवीसांची खास शैलीत टीकाSaam Tv News

मुंबई - मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यात खड्ड्यांचीही भर आहेत. याचप्रश्नी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक फोटो ट्विट करत आपल्या खास शैलीत प्रशासनावर निशाणा साधला आहे. Amrita Fadnavis criticizes the government over the pits and stagnant water in Mumbai

या फोटाेमध्ये अमृता फडणवीसांच्या मागे पावसामुळे तळ्याचे स्वरुप आलेले एक ठिकाण दिसतेय. तसेच काही चारचाकी वाहनेही दिसतायत. मात्र खड्ड्यांमुळे आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे रस्ता किंवा जमीन कुठेच दिसत नाही. यामुळेच याला ठेंगा दाखवत त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून प्रशासनावर टीका केली आहे.

हे देखील पहा -

अमृता फडणवीस आपल्या ट्विटमध्ये शायरीच्या अंदाजात लिहीतात की, ''इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब, पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब !'' म्हणजेच या शहरात प्रत्येक वळणावर खड्डे मिळतील, पण याचा एकही दोषी सापडणार नाही. हा फोटो कुठला आहे, याबाबत कळलेलं नाही. मात्र यावर अनेक प्रतिक्रीया येतायत. काहींनी कमेंट्स मध्ये नागपुरच्या पावसाळ्यातील फोटो टाकत अमृता फडणवीसांनाच उलट प्रश्न केला आहे. त्या राजकारणात प्रत्यक्ष सहभागी होत नसल्या तरी अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे त्या सतत चर्चेत असतात. त्यांना गाण्याचीही खास आवड आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com