अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर हल्लाबोल; आरोपांवर Tweet करत दिलं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज खळबळजनक आरोप केले.
अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर हल्लाबोल; आरोपांवर Tweet करत दिलं उत्तर
अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर हल्लाबोल; आरोपांवर Tweet करत दिलं उत्तरSaam Tv

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP नेते आणि मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यावर आज खळबळजनक आरोप केले. नवाब मलिकांनी आज फडणवीस यांचा ड्रग्ज पेडलेरसोबत संबंध असल्याचा आरोप केला. तसंच त्यांनी अमृता फडणवीस Amruta Fadnavis यांच्यासोबत ड्रग्ज पेडलरचा फोटो ट्विट केला आहे. या सर्व खळबळजनक आरोपांवर अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. ट्विटर वर ट्विट करुन अमृता फडणवीस यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे.

चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते !, असं म्हणत अमृता यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिकांचे आरोप

नवाब मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत. जयदीप राणाचा फोटो नवाब मलिक यांनी ट्वीट केला. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने एक गाणं बनवले होते. त्यात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही अभिनय केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्यात अमृता फडणवीस या गाणे म्हणाल्या होत्या. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा (Jaideep Rana) आहेत. याच गाण्याचा फायनान्सर हा जयदीप राणा होता, असं नवाब मलिकांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन सगळा ड्रग्जचे खेळे सुरु आहेत असा, खळबळजनक आरोपही नवाब मलिकांनी केला. नीरज गुंडे नामक व्यक्तीचं नाव घेतल, ते देवेंद्र फडणवीसांच्या काळातील 'वाझे' होते, असा आरोप नवाब मलिकांनी केला.

अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर हल्लाबोल; आरोपांवर Tweet करत दिलं उत्तर
Pune: शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वानवडीतील घटना

देवेंद्र फडणवीस यांचं मलिकांच्या आरोपांवर उत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी आता पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. जो फोटो नवाब मलिक यांनी ट्विट केला आहे. तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो. मी त्यांना मदत करत होतो. गाण्याच्या शूटिंगच्या वेळी तो फोटो काढण्यात आला होता. नवाब मलिक यांनी जाणीवपूर्वक एकच फोटो ट्विट केला याने यामागची मानसिकता दिसत आहे असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com