आज वसुली चालू आहे की बंद?; अमृता फडणवीसांच खोचक ट्विट

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी सुद्धा ठाकरे सरकारवर आज निशाणा साधला आहे.
आज वसुली चालू आहे की बंद?; अमृता फडणवीसांच खोचक ट्विट
आज वसुली चालू आहे की बंद?; अमृता फडणवीसांच खोचक ट्विटSaam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई : उत्तर प्रदेशमधील Uttar Pradesh लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराबाबत शेतकरी महाराष्ट्र राज्यात आज महाविकास आघाडीकडून आज बंदची Maharashtra Bandh हाक दिली आहे. आज पुकारलेल्या बंदला सर्व राज्यात ठिकठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजप BJP कडून मात्र या बंदला आक्रमकपणे विरोध करण्यात येत आहे. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस Amruta Fadnavis यांनी सुद्धा ठाकरे सरकारवर State Government आज निशाणा साधला आहे.

राज्यभरात आज होत असलेल्या बंदला भाजप आणि मनसे कडून विरोध केला जात आहे. अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आज पुकारलेल्या बंदवरून खोचक असा एक प्रश्न विचारला आहे. कोणी मला माहिती देऊ शकेल का? आज वसुली चालू आहे का बंद?, असं अमृता फडणवीस ट्विटरच्या माध्यमातून म्हणाल्या आहेत.

आज वसुली चालू आहे की बंद?; अमृता फडणवीसांच खोचक ट्विट
Nashik: क्रिकेट खेळताना चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षीय मुलाचा मृत्यू!

अमृता फडणवीस या त्यांच्या सोशल मीडिया वर चांगल्याच सक्रीय असतात. तसेच त्या आपलं विविध विषयांवर साडेतोड मत मांडत असतात. आज राज्यभरात असलेल्या बंदवरून अमृता फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपाचा धागा पकडून त्याचा आधार घेतला आहे असे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.