Amul Milk Prices: महागाईचा आणखी एक झटका! अमूल दुधाच्या किमतीत वाढ

Amul Milk Prices: फुल क्रीम दूध ६३ रुपयांऐवजी ६६ रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे.
Amul Milk
Amul Milk Saam Tv

Amul Milk News: महागाईत सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा झटका बसला आहे. अमूलने पुन्हा एकदा आपल्या दुधाच्या किमतीत वाढ केली आहे. फुल क्रीम दूध ६३ रुपयांऐवजी ६६ रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे.

म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 5 रुपयांनी 65 रुपयांवरून 70 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अमूल दही आणि इतर प्रोडक्ट्सच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. वाढलेले नवे दर आज म्हणजे 3 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

Amul Milk
World Billionaires List : गौतम अदानींना तगडा झटका! श्रीमंतांच्या यादीत 22व्या स्थानावर घसरण, मुकेश अंबानीही टॉप-10 मधून बाहेर

अमूल प्रोडक्ट्सचे नवे दर

  • अमूल ताजा अर्धा लीटर - 27 रुपये

  • अमूल ताज एक लीटर- 54 रुपये

  • अमूल गोल्ड अर्धा लीटर - 33 रुपये

  • अमूल गोल्ड एक लीटर - 66 रुपये

  • अमूल गाईचे दूध अर्धा लीटर - 28 रुपये

  • अमूल गाईचे दूध अर्धा लीटर - 56 रुपये रुपये

  • अमूल म्हशीचे दूध अर्धा लीटर- 35 रुपये

  • अमूल म्हशीचे दूध अर्धा लीटर- 70 रुपये

Amul Milk
Mumbai News : तब्बल १० लाखांची बनावट नाणी जप्त, एका आरोपीला अटक

सहकारी व खासगी दूध डेअर्‍यांनीही किमती वाढवल्या

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सहकारी व खासगी दूध डेअर्‍यांनी गायीच्या दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती. महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने याबाबत निर्णय घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com