Pune Crime News: पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्कमध्ये गोळीबार; तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

दिसत असलेल्या दृश्यांनुसार, रस्त्याच्या कडेला एका मुलाला ६ जण जबर मारहाण करत आहेत.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV

Pune Crime News: पुण्यातील उच्चभ्रू परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल, गुरुवारी रात्री कोरेगाव कात्रज येथे गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत एका तरुणाला ६ जणांनी जबर मारहाण केली आहे. सध्या जखमीला रुग्णालयात दाखल केले आसून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune)उच्चभ्रू परिसरातील कोरेगाव पार्कमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पूर्व वैमन्यसातून दोन गटात राडा झाला. यावेळी आरोपी सोन्या दोडमणी याने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. याप्रकरणी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News
Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत वाद, पाहा सविस्तर बातमी | SAAM TV

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यात दिसत असलेल्या दृश्यांनुसार, रस्त्याच्या कडेला एका मुलाला ६ जण जबर मारहाण करत आहेत. यावेळी आरोपी सोन्या दोडमणी हवेत गोळीबार करतो. तसेच इतर सर्वजण त्या मुलाचा जीव घेण्याच्या हेतूने त्याच्या तोंडावर ७ ते ८ वेळा लाथाबुक्यांनी मारहाण करतात. तसेच नंतर एक दगड (Stone) त्याच्या तोंडावर मारतात. या अमानुष मारहाणीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Pune Crime News
Nashik Crime : अल्पवयीन मुलाकडून ४ वर्षीय चिमुकल्याची हत्या; आधारतीर्थ अनाथ आश्रमातील खूनाचा अखेर उलगडा

मारहाण झाल्यावर हे सर्वजण एका कारमध्ये बसून तेथून निघून गेल्याचे दिसत आहेत. सदर घटनेबाबत कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्व वैमन्यसातून ही मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com