जितेंद्र आव्हाडांचं बौद्धिक धर्मांतर झालंय, आत्ता जाहीर धर्मांतर करावं - हिंदू महासंघ

'भारत हा हिंदूचा देश आहे. इथं सानातन धर्म जिवंत राहिल ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.'
जितेंद्र आव्हाडांचं बौद्धिक धर्मांतर झालंय, आत्ता जाहीर धर्मांतर करावं - हिंदू महासंघ
Jitendra Awhad's Tweet, Jitendra Awhad News, Anand Dave On Jitendra AwhadSaam TV

प्राची कुलकर्णी -

पुणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे बौद्धिक धर्मांतर कधीच झालं आहे, त्यांनी आत्ता जाहीर धर्मांतर करावं असं वक्तव्य हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी केलंय. आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन एक ट्विट करत त्यांनी सनातन धर्मावर टीका केली आहे, त्यांच्या या ट्विटवर आनंद दवे (Anand Dave) यांनी प्रतिक्रिया दिली. (Jitendra Awhad News)

'भारत हा हिंदूचा देश आहे. इथं सानातन धर्म जिवंत राहिल ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.' असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर (Sadhvi PragyaSingh Thakur) यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्याचा वर आव्हाडांनी ट्विट (Tweet) केलं आहे.

त्यांनी ट्विट मध्ये म्हंटलं आहे की, ' सनातन धर्म म्हणजे, स्त्री हि उपभोगाची वस्तू आहे जिच्या डोळ्यात कायम वासना असते. अस्पृश्यता, वर्णव्यवस्था ह्याला मान्यता, विषमता आधारित समाज व्यवस्था, हा सनातन धर्म हजारो वर्ष भारताला छळतो आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सनातनी मार्गदर्शक पुस्तिका मनूस्मृती जाळली.' असं ट्विट करत त्यांनी सनातन धर्मावर टीका केली आहे.

त्यांच्या या ट्विटवर आता हिंदू महासंघ आक्रमक झाला असून, आव्हाड यांच बौद्धिक धर्मांतर झालं आहेच, त्यांनी आता जाहीर धर्मांतर करावं असं हिंदू महासभेचे आनंद दवे म्हणाले.

हे देखील पाहा -

'आव्हाड यांनी हिंदू धर्माचा अपमान केला आहे. हिंदू धर्म हा असा असतो हे त्यांना कोणी आणि कोठे शिकवले आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. तसंचजर धर्म एवढा वाईट आहे तर मग पोटगी नाकारणाऱ्या, २ मिनिटात तलाक देणारा शांती प्रिय धर्म त्यांनी स्वीकारावा मतांसाठी हिंदू धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या आव्हाडांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करत असल्याचं दवे साम टिव्हीशी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com