आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ; अटके पासून अंतरिम दिलासा नाही
आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ; अटके पासून अंतरिम दिलासा नाहीSaam Tv

आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ; अटके पासून अंतरिम दिलासा नाही

सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवर ईडीच्या फेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे

मुंबई : सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवर ईडीच्या फेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण त्यांना मुंबईत सत्र न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.

मुंबई सत्र न्यायालयात विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एच. एस. सतभाई यांनी अडसूळ यांची अंतरिम अटकपूर्व जामीन देण्याची विनंती फेटाळून लावली आहे. अर्जाची सुनावणी 25 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून तूर्तास दिलासा देण्याची मागणी देखील न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

हे देखील पहा-

न्यायालयाच्या या निर्णयाने अडसूळ यांच्या अडचणीत वाढल्या आहेत आणि ईडी त्यांना केव्हाही अटक करू शकते. माजी खासदार आनंदराव अडसूळ सिटी सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये बँकेत सुमारे ९०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती.

ईडीच्या अधिकार्‍यांनी 27 सप्टेंबर दिवशी सकाळी अडसूळ यांच्या पश्चिम उपनगरातीस राहत्या घरी आणि कार्यालयावर धाडी टाकून चौकशी करत असताना अचानक अडसूळ यांची तब्येत बिघडली होती. मात्र, त्यांना लगोलग गोरेगावच्या लाईफलाईन केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान ईडीच्या या कारवाईला विरोधात अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करण्यात आली होती.

आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ; अटके पासून अंतरिम दिलासा नाही
'हिंदुत्व पहायचं असेल तर...': सलमान खुर्शीद

मात्र, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामीनाकरिता रितसर अर्ज करण्याचे निर्देष अडसूळांना देण्यात आले होते. यानुसार अडसूळ यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

त्या अर्जावर न्यायाधीश एच. एस. सतभाई यांच्या समोर सुनावणी झाली होती. यावेळी ईडीने याला जोरदार विरोध केला होता. त्यावेळी अडसूळ यांच्यावतीने अर्जावर सुनावणी होईपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन द्यावा, अशी विनंती करण्यात आली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावत ईडीला भूमिका मांडण्याचे निर्देश देत या अर्जाची सुनावणी 25 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com