Andheri Crime: नोकराचा मालकावर जीवघेणा हल्ला.. आधी विजेचा शॉक, नंतर गळा आवळला; धक्कादायक कारण समोर

Amboli Crime News Update: घटनेत जखमी मालकावर सध्या स्व. बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Andheri Crime News
Andheri Crime NewsSaam Tv

Andheri Crime News: घरमालक नीट वागवत नाही म्हणून घरातील कुकने मालकाला विजेचा शाॅक देऊन त्याचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबोलीमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

Andheri Crime News
Beed Online Fraud News: जम्मू- काश्मीरमध्ये बसून बीडच्या सिमेंट व्यापाऱ्याला लाखोंचा गंडा; सायबर पोलिसांकडून तिघांना अटक

याबाबत सविस्तर माहिती अशी की, घरमालक नीट वागत नाही म्हणून घरातील कुकने मालकाला वायरने वीजेचा शाॅक देऊन त्याचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायत घटना अंबोलीत (Amboli) उघडकीस आली आहे. या घटनेत बेतशिबा शेठ (४२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्व. बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंधेरी पश्चिम (Andheri East) येथील राॅयल क्लासिक, ई विंग, १३ वा माळा न्यू लिंक रोड येथे ही घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी आरोपी राजकुमार सिंग (कुक) वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस राजकुमार सिंगचा शोध घेत आहेत.

अल्पवयीन मुलाच्या हत्या करणाऱ्या टोळीला दणका...

ढोलपथकामध्ये सराव करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली होती. या प्रकरणातील आरोपी चंद्रशेखर कापरे याच्यासह त्याच्या टोळीतील १० जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पुण्यातील गुन्हेगारांना वचक बसणार आहे. (Latest Marathi News)

Andheri Crime News
Bus Accident : उदय सामंत यांच्यासमोरच एसटी बसला अपघात, उद्योगमंत्री खाली उतरून प्रवाशांच्या मदतीला धावले

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com