Vedanta Foxconn Project : वेदांता फॉक्सकॉनवर आता खूद्द मालकांनीच दिले स्पष्टीकरण

वेदांत फॉक्सकॉनवरुन आरोप-प्रत्यारोप होत आहे.
Anil Agarwal, Vedanta Foxconn Project
Anil Agarwal, Vedanta Foxconn ProjectSaam Tv

मुंबई: वेदांत (Vedanta)-फॉक्सकॉन कंपनीचा महाराष्ट्रात प्रकल्प प्रस्तावीत होता हा प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणी दोन दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकावर हल्लाबोल सुरू केला आहे. या प्रकरणी आता वेदांत कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे.

Anil Agarwal, Vedanta Foxconn Project
Vedanta Foxconn Project : वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने जास्त सवलत देऊनही गुजरातला गेला

वेदांत-फॉक्सकॉन अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकीसाठी व्यावसायिकरित्या मूल्यांकन करत आहे. ही एक वैज्ञानिक आणि आर्थिक प्रक्रिया आहे ज्याला अनेक वर्षे लागतात. आम्ही याची सुरुवात सुमारे २ वर्षांपूर्वी केली होती. आमचा उद्देश साध्य करण्यासाठी आमच्या अंतर्गत आणि बाह्य व्यावसायिक एजन्सीच्या टीमने काही राज्ये उदा., गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र गेल्या २ वर्षांपासून आम्ही या प्रत्येक सरकारशी तसेच केंद्र सरकारशी संलग्न आहोत आणि आम्हाला पाठिंबा मिळाला आहे.

या सरकारांनी आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळे आम्ही काही महिन्यांपूर्वी गुजरातचा निर्णय घेतला. पण जुलैमध्ये महाराष्ट्राच्या नेतृत्वासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी स्पर्धात्मक ऑफरसह इतर राज्यांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला. आम्हाला एकाच ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि व्यावसायिक आणि स्वतंत्र सल्ल्यानुसार आम्ही गुजरातची निवड केली.

ही अब्जावधी डॉलरची दीर्घकालीन गुंतवणूक भारतीय इलेक्ट्रॉनिक्सची दिशा बदलेल. आम्ही संपूर्ण भारतातील इकोसिस्टम तयार करू आणि महाराष्ट्रातही गुंतवणूक करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आमच्या गुजरात JV मध्ये एकीकरण पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र आमची गुरुकिल्ली असेल, असं ट्विट अनिल अग्रवाल (Anil Agarwal) यांनी केले आहे.

Anil Agarwal, Vedanta Foxconn Project
Narendra Modi | पंतप्रधान मोदी यांचे मुख्यमंत्र्यांना मोठं आश्वासन, म्हणाले,'वेदांतापेक्षाही...'

शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार सत्तेत येण्याअगोदर वेदांत-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचे बोलले जात होते. या प्रकरल्पासाठी लागणारी आवश्यक ते प्रयत्न ठाकरे सरकारने केले होते, पण आता शिंदे-फडणवीस सरकारने या प्रकल्पासाठी लागणारी पुर्तता केली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचेही विरोधकांनी म्हटले आहे. या प्रकल्प प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे.

वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून होणारा प्रकल्प तीन टप्प्यांत महाराष्ट्रात होणार होता. यासाठी १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. आता हा प्रस्तावीत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे अनेक रोजगार गुजराला गेले असल्याचा आरोप केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com