Anil Deshmukh News: परमवीर सिंह यांचा अदृश्य शक्तीने वापर केला; अनिल देशमुख यांचा रोख नेमका कुणाकडे?

Anil Deshmukh News: अनिल देशमुख यांनी १०० कोटींच्या खंडणी प्रकरणावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी परमवीर सिंह यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत.
Anil Deshmukh News
Anil Deshmukh NewsSaam tv

अक्षय बडवे

Anil Deshmukh News: राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अनिल देशमुख यांनी १०० कोटींच्या खंडणी प्रकरणावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी परमवीर सिंह यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. ' मला 14 महिने जेलमध्ये काढावे लागले. पण कोर्टाने मला न्याय दिला. राज्य सरकार त्यांना संरक्षण देत होते हे अतिशय दुर्दैुवी आहे. परमवीर सिंह यांचा अदृश्य शक्तीने वापर केला, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. (Latest Marathi News)

१०० कोटींच्या खंडणी प्रकरणात जामीनावर तुरुंगाबाहेर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख म्हणाले, 'उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवण्याच्या प्रकरणात आणि मनसुख हिरेन प्रकरणात परमवीर सिंह यांची बदली केली होती. निलंबित केलं होतं. काही राजकीय शक्तींनी त्यांचा वापर करून घेतला'.

Anil Deshmukh News
Rahul Gandhi On New Parliament building: संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन पंतप्रधानांनी नाही, तर राष्ट्रपतींनी केले पाहिजे : राहुल गांधी

'मला एका खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं. माझ्यावर आरोप झाले, कोर्टात त्याचे पुरावे सादर झाले नाहीत. माझ्यावर १०० कोटीचा आरोप पुढे १ कोटी ७१ लाखांवर आला. त्यानंतर कोर्टात त्याचे पुरावे पण नव्हते. परमवीर सिंह आतापर्यंत निलंबित होते. परमवीर सिंह हे चांदिवाल आयोगासमोर हजर झाले नाही. ७ महिने ते फरार होते, असेही देशमुख म्हणाले.

Anil Deshmukh News
Nitesh Rane On Uddhav Thackeray: ठाकरेंचं कर्जतमधील फार्महाऊस खोदलं 2000च्या नोटांचा ढिग सापडेल; राणेंचा गंभीर आरोप

'परमवीर सिंह यांनी माझ्या विरोधात पुरावे सादर करायला हवे होते. मात्र, कुठलेही पुरावे नाहीत, असे प्रतिज्ञापत्र त्यांनी कोर्टाला दिले आहे. कॅटने राज्य शासनाला अहवाल मागितला मात्र एक ही अहवाल त्यांनी दिला नाही. कॅटने एकतर्फी निर्णय घेऊन त्यांचे निलंबन मागे घेतलं. आता पुढे काय करायचे या संदर्भात आम्ही कायदेतज्ञ यांच्याशी बोलत आहोत, असे देशमुख म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com