काही दिवसातच अनिल देशमुखांना अटक होणार, किरीट सोमय्यांचा दावा

आज पुन्हा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कटोल आणि वडविहार याठिकाणी असलेल्या घरावर ED ने छापा टाकला आहे.
काही दिवसातच अनिल देशमुखांना अटक होणार, किरीट सोमय्यांचा दावा
काही दिवसातच अनिल देशमुखांना अटक होणार, किरीट सोमय्यांचा दावाTwitter/@ANI

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी 100 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यांनतर त्यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाने (ED) कारवाई सुरु केली आहे. आज पुन्हा अनिल देशमुख यांच्या कटोल आणि वडविहार याठिकाणी असलेल्या घरावर ED ने छापा टाकला आहे. याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. (Anil Deshmukh will be arrested in a few days, claims Kirit Somaiya)

- पहा व्हिडीओ

अनिल देशमुखांनी हजार कोटीची माया जमवली आहे. शंभर कोटीहुन अधिक रुपयांची मनी ट्रेल, कॅश ट्रेल सापडली आहे. आता अशा अनेक धाडी पडणार, अनेक प्राॅपर्टी सील होणार आणि काही दिवसातच अनिल देशमुखांना अटक होणार, असा दावा यावेळी किरीट सोमय्या यांनी केला आहे. आता प्रश्न काही दिवसांचा आहे, असेही त्यांच्यावर टिका केली आहे.

यावेळी बोलतना, अनिल देशमुख, एकनाथ खडसे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या डोक्यावर इडीची टांगती तलवार आहे, असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले की, मी मोदी सरकार, इडी, सुप्रीम कोर्ट, हाय कोर्टाला आणि इतर यंत्रणाना धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे या लोकांनी जी लुटमार चालवली होती तो पैसा आता जनतेच्या तिजोरीत जमा होणार. इतके दिवस जे स्वतला सांभळून ठेवलं होतं त्या सर्वांचा तपास होऊन घोटाळेबाजांच्या सर्व प्राॅपर्टी आता जप्त होणार, असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

काही दिवसातच अनिल देशमुखांना अटक होणार, किरीट सोमय्यांचा दावा
एकही रुग्णाची झाली नाही नाेंद; काळजी घ्या, सुरक्षित रहा!

भाजपाकडून यंत्रणावर दबाव टाकला जात असल्याने या कारवाया होत असल्याचे बोलले जात आहे, असे विचारले असता सोमय्या म्हणाले की, जे चोर आहेत, जे लबाड आहेत, घोटाळेबाज आहेत, ज्यांना जेलचे दरवाजे दिसत आहेत, ते असे आरोप करत आहेत. ते सुप्रीम कोर्ट, हाय कोर्टात डझनवेळा जाऊन आलेत, मग भाजपा आणि किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार कोर्ट त्या्च्यावर कारवाई करत आहे, असे त्यांना म्हणायचे आहे का, असा सवालही यावेळी किरीट सोमय्या यांनी केला आहे.

जसे संजय राऊत यांनी चोरीचे 55 लाख रुपये परत केेले तसे अमिन देशमुख, अजित पवार, रोहित पवार यांनीदेखील परत जनतेचे पैसे परतकरावेत, संजय राऊतांकडून काहीतरी शिका, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com