अनिल देशमुखांना न्यायालयाचा दिलासा नाहीच; जे.जे. रुग्णालयात उपचार घेण्याचे निर्देश
Former Home Minister Anil Deshmukh Saam TV

अनिल देशमुखांना न्यायालयाचा दिलासा नाहीच; जे.जे. रुग्णालयात उपचार घेण्याचे निर्देश

देशमुख यांनी कोर्टात खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवागनी मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती.

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी कोर्टाकडे (Court) परवानगी मागितली होती. ही मागणी कोर्टाने फेटाळली आहे. कोर्टाने जेजे रुग्णालयात उपचार घेण्याचे निर्देश दिले आहेत. देशमुख यांनी कोर्टात खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवागनी मिळावी यासाठी याचिका केली होती. या याचिकेला ईडी'ने (ED) सोमवारी विरोध केला होता.

Former Home Minister Anil Deshmukh
एक कुटुंब एक तिकीटाच्या निर्णयावर काँग्रेसचे एकमत; काँग्रेस घेणार मोठा निर्णय

माजी मृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे जेलमध्ये पडले होते. यावेळी त्यांचा खांद्याला दुखापत झाली आहे. दुखापत गंभीर असल्याचे सांगत शस्त्रक्रिया करणे गरजेचे असून सरकारी रुग्णालयात त्यासाठीच्या यंत्रणा अपुऱ्या असल्याचे सांगत, देशमुखांनी खासगी रुग्णालयात उपचार करण्यास परवानगी मिळावी, अशी देशमुखांच्यावतीने न्यायालयात मागणी केली होती. न्यायालयाने खासगी रुग्णालयाची मागणी फेटाळत उपचार जे.जे. रुग्णालयात करण्यास परवानगी दिली आहे. तसेच उपचारा दरम्यान घरातील एका व्यक्तीला रुग्णालयात उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे.

१०० कोटी वसुली प्रकरण काय आहे?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. या पत्रात त्यांनी अनिल देशमुखांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले असल्याचा असा आरोप केला होता. निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अनिल देशमुख त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं आणि १०० कोटी जमा करण्यास सांगितलं होतं, असा आरोप या पत्रात करण्यात आला होता. या प्रकरणात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.