अनिल देशमुख गायब नाहीत; पहा व्हिडीओ

अंमलबजावणी संचलानालयाने (ED) केलेल्या कारवाईनंतर अनिल देशमुख गायब असल्याचे भाजपा नेते बोलत होते.
अनिल देशमुख गायब नाहीत; पहा व्हिडीओ
अनिल देशमुख गायब नाहीत; पहा व्हिडीओ Saam tv

सुरज सावंत

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) गायब आहेत. त्यांचा फोन नॉट रिचेबल लागतोय अशा बातम्या आज सकाळापासून पसरत आहे. अंमलबजावणी संचलानालयाने (ED) केलेल्या कारवाईनंतर अनिल देशमुख गायब असल्याचे भाजपा नेते बोलत होते. अशातच अनिल देशमुख यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात त्यांनी इडीच्या कारवाईबाबत आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

-पहा व्हिडीओ

ईडीने माझा कुटुंबियांची 4 कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या कारवाईत माझा मुलगा सलील देशमुख याची 2006 साली घेतलेली 2.67 कोटीची जमिनही जप्त करण्यात आली आहे. मात्र काही माध्यमांनी आणि वृत्तपत्रांनी ही जमीन 300 कोटीची असल्याची बातमी देऊन गैरसमज पसरवला जात आहे. याबाबत मी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून सुप्नीम कोर्टाचा जो काही निर्णय असेल, त्यानंतर मी ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आज सकाळी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख गायब आहेत. इडीने ३ वेळा समन्स बजावले आहेत. काटोल, नागपुरसह त्यांच्या घरांवर छापेमारी करुनही ते भेटत नाहीत. अनिल देशमुख यांनी १००० कोटींची माया जमवली आहे. तर १०० कोटीची मनी ट्रेल, कॅश ट्रेल सिद्ध झाली आहे. असल्याचा दावा केला आहे. तसेच ते कोणाला दिसले तर कळवा, असेही यावेळी किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख गायब नाहीत; पहा व्हिडीओ
राष्ट्रवादीचे नाराज नेते भाजपत, निवडणुकीसाठी गोळाबेरीज

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी 100 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यांनतर त्यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाने कारवाई सुरु केली आहे. काल पुन्हा अनिल देशमुख यांच्या कटोल आणि वडविहार याठिकाणी असलेल्या घरावर ED ने छापा टाकला. यानंतर हे प्रकरम दररोज वेगवेगळ्या वळणावर जात असल्याचे दिसत आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com