अनिल देशमुखांना ईडीचा दणका; 4.20 कोटींची मालमत्ता जप्त

जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.
अनिल देशमुखांना ईडीचा दणका; 4.20 कोटींची मालमत्ता जप्त
अनिल देशमुखांना ईडीचा दणका; 4.20 कोटींची मालमत्ता जप्तसुरज सावंत

मुंबई - अनिल देशमुख Anil Deshmukh यांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती ईडीने ED जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग Money Laundering प्रकरणी ईडीने ही कारवाई केली असून तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर या प्रकरणात अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडीने आपल्या ताब्यात घेतला असून आता कारवाई सुरू आहे.

अनिल देशमुखांना ईडीचा दणका; 4.20 कोटींची मालमत्ता जप्त
राष्ट्रीय महामार्गावर साचलेल्या पाण्यात जहाज सोडून युवकांची अनोखी गांधीगिरी !

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्या घरी ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून धाड सुद्धा टाकण्यात आली होती. त्यानंतर ईडीने यांना अनिल देशमुख समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, अनिल देशमुख हे ईडीच्या चौकशीला उपस्थित झाले नव्हते. ईडीच्या आतापर्यंतच्या तपासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात ईडीकडून अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन्ही मुलांची देखील चौकशी केली जाऊ शकते.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com