सर्वांनी अनिल देशमुखांना सांगितलं, जेल जाना पडेगा : साेमय्या

kirit somaiya anil deshmukh
kirit somaiya anil deshmukh

मुंबई : माजी गृहमंत्री Anil Deshmukh हे आज (साेमवार) स्वतःहून ईडीच्या कार्यालयात EnforcementDirectorate त्यांच्यावरील आराेपाबाबतच्या चाैकशीसाठी हजर झाले. याबाबत भाजप नेते किरीट साेमय्या Kirit Somaiya यांनी हे तर हाेणारच हाेते अशी प्रतिक्रिया दिली. देशमुख हे स्वतःच्या गाडीने आले असले तरी जाताना ईडीच्या कस्टडीत जातील असा विश्वास साेमय्या यांनी व्यक्त केला.

kirit somaiya anil deshmukh
सावधान! राणेंची रक्तरंजित राजकारणाची पध्दत पुन्हा सुरु : राऊत

साेमय्या म्हणाले अखेर अनिल देशमुख यांना ईडीच्या कस्टडीत जावे लागणार. ते आले स्वतःच्या गाडीतून परंतु जाणार ईडीच्या कस्टडीत. अनिल देशमुख यांना आता शंभर काेटी रुपयांचा हिशोब द्यावा लागणार. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे हे पैसे कसे वळवले जात होते हा हिशाेब तर द्यावा लागणार अनिल देशमुखांना हे सांगावे लागणार.

शरद पवार sharad pawar आणि उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी त्यांना वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले. न्यायालयांनी देखील त्यांना सांगितले जेल ताे जाना ही पडेगा. परमबीर सिंग यांनी सांगितले आम्ही आमच्या बाॅसने सांगितलेले करायचाे. आता अनिल देशमुखांना सांगावे लागणार इतके पवारांकडे आणि तितके ठाकरेंकडे जायचे. आत्ता ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू होणार असे सोमय्या यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com