anil deshmukh
anil deshmukh Twitter/@ANI

Anil Deshmukh News: अनिल देशमुख यांना मोठा झटका; सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

Anil Deshmukh Latest News: 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांनी सीबीआय कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता.

Anil Deshmukh News: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. मनी लॉड्रींग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असेलल्या अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे देशमुख यांच्या नागपूर कार्यालयातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी झाली आहे. (Anil Deshmukh Latest News)

anil deshmukh
Beed News: मांजरा धरणाचे पुन्हा 6 दरवाजे उघडले; धुवाधार पावसाने बीड जलमय

अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय (CBI) न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता अनिल देशमुख यांची दिवाळी यावेळीही तुरुंगातच जाणार आहे. 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांनी सीबीआय कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. याच प्रकरणात ईडी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला आहे. ईडीकडून जामीन मिळाल्यानंतर देशमुख यांनी सीबीआय कोर्टात जामिनासाठी अपील केले होते, त्याला सीबीआय न्यायालयाने झटका देत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे त्यांच्या नागपूर येथील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी वाढली आहे.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एसएच ग्वालानी यांनी गुरुवारी जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. राष्ट्रवादीच्या देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना गेल्या आठवड्यात ‘कोरोनरी अँजिओग्राफी’साठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

anil deshmukh
Invest In MP: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पुण्यात येणार; राज्यातील प्रकल्प पुन्हा परराज्यात जाणार?

अनिल देशमुखांवर काय आहेत आरोप?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीनेही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. देशमुख यांनी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करून मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून ४.७ कोटी रुपये गोळा केल्याचा दावा ईडीने केला होता. गैरप्रकाराने मिळवलेले पैसे त्यांनी नागपूर येथील श्री. साई शिक्षण संस्थेला पाठवण्यात आल्याचा आरोप ईडीने केला होता.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com