
Anil Jaisinghani Bail: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी वसुली प्रकरणात अटकेत असलेला क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याला जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारी 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्याच्या (१८ सप्टेंबर) अनिल जयसिंघानीला सशर्त जामीन मंजूर केला आहे. (Latest Marathi News)
मात्र, अनिल जयसिंघानीवर आणखी दोन गंभीर गुन्हे असल्याने त्याची तुरुंगातून सुटका होणार नाही. अनिल जयसिंघानीने प्रत्येक सुनावणीला हजर राहावे, त्याचबरोबर साक्षीदारांना धमकावू नये, असे निर्देश देखील मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, यापूर्वी अनिल जयसिंघानी याची मुलगी आणि भाऊ यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
अनिल जयसिंघानी हा बुकी असून तो फरार आरोपी देखील आहे. त्याच्यावर विविध ठिकाणी १५ गुन्हे दाखल आहेत. २० फेब्रुवारी रोजी अनिल जयसिंघानी याच्या मुलीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेल तसेच लाचेची ऑफर दिली होती. याशिवाय फोनवरुन धमकावले देखील होती.
यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल जयसिंघानी हा यामागील सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात जयसिंघानीला १६ मार्च रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली.
अनिल जयसिंघांनी याची मुलगी अनिक्षा फँशन डिझायनर आहे. नोव्हेंवर २०२१ मध्ये ती अमृता फडणवीस यांना भेटली होती. आपल्या आईचं निधन झालं असून मी सर्व कुटुंबाचा भार उचलते, अस म्हणत अनिक्षाने अमृता यांच्यासोबत जवळीक साधत मैत्री केली. त्यानंतर ती अमृता फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जात होती.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.