अनिल परबांच्या अडचणीत वाढ, खरमाटेंना ईडीची नोटीस

राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग खरमाटे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रकरणी नोटीस बजावली
अनिल परबांच्या अडचणीत वाढ, खरमाटेंना ईडीची नोटीस
अनिल परबांच्या अडचणीत वाढ, खरमाटेंना ईडीची नोटीसSaam Tv

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग खरमाटे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रकरणी नोटीस बजावली आहे. अनिस परब यांचे विश्वासू आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीने आज 6 सप्टेंबर दिवशी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

हे देखील पहा-

बजरंग खरमाटे यांनी ईडीने बजावलेली पहिले समन्स आहे. या अगोदर अनिल परब यांना देखील चौकशीकरिता हजर राहण्यास ईडीने नोटीस बजावली आहे. आता अनिल परब यांचे जवळचे सहाय्यक यांना समन्स बजावले आहे. यामुळे अनिल पराब यांच्या अडचणी मध्ये आणखी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. 30 ऑगस्ट दिवशी ईडीने बजरंग खरमाटे यांच्या नागपूर या ठिकाणी घरावर छापेमारी करण्यात आली होती.

खरमाटे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला आहे. ईडीने काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे देखील सांगितले जात आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली होती. नोटीसनुसार त्यांना मंगळवारी (ता. ३१) ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, अनिल परब उपस्थित झाले नाही. मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने काही ठरलेली कामे आहेत.

अनिल परबांच्या अडचणीत वाढ, खरमाटेंना ईडीची नोटीस
एकनाथ खडसे यांच्या पत्नीला दुसऱ्यांदा ईडीची नोटीस

यामुळे चौकशीकरिता हजर राहू शकत नाही, असे अनिल परब यांनी ईडी कार्यालयात कळवले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमध्ये अनिल परब भूमिका बजावत असल्याचे एका व्हिडीओद्वारे दिसून आले होते. तेव्हापासूनच, अनिल परब यांना टार्गेट करण्यात येत आहे, अशी चर्चा देखील होती. त्यानंतर आधी अनिल परब यांना नोटीस पाठवण्यात आली होती.

यानंतर आता त्यांचे विश्वासू बजरंग खरमाटे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. अगोदर संजय राठोड गेले, मग गृहमंत्री अनिल देशमुख गेले. आता अनिल परब यांचा नंबर आहे. महाविकास आघाडी मधील मंत्र्यांची आणखी मोठी लिस्ट आहे. रांगेने एक एक मंत्री येत आहेत. काही जणं सुपात आहेत तर काही जणं जात्यात आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com