आजही तोडगा नाही; संप मागे घ्या, चर्चा करु- अनिल परब

कमिटीचा अहवाल आल्यानंतर सरकार त्यावर योग्य तो विचार करेल. ऍडव्होकेट जनरलशी मी बोलेन, असंही परब बैठकीदरम्यान बोल्याचे त्यांनी सागितले.
आजही तोडगा नाही; संप मागे घ्या, चर्चा करु- अनिल परब
आजही तोडगा नाहीच; संप मागे घ्या, चर्चा करु- अनिल परब- Saam Tv

मुंबई: एसटी संपाच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री अनिल परब यांची आज भेट घेतली. या बैठकीकडे सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून होते. या बैठकीनंतर बोलताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, एसटीच्या संपाची ज्या युनियने नोटीस दिली होती त्या संघटनेचे अध्यक्ष गुजर, वकील सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्यासोबत बैठक झाली. विलीनीकरणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरला होता. त्यांच्याशी चर्चा करताना मी त्यांना हायकोर्टाच्या त्रीसदस्यीय कमिटीची आठवून करुन दिली. हायकोर्टाने निर्देश दिलेले असताना मला त्यामध्ये काही बदल करता येणार नाही. कमिटीचा अहवाल आल्यानंतर सरकार त्यावर योग्य तो विचार करेल. ऍडव्होकेट जनरलशी मी बोलेन, असंही परब बैठकीदरम्यान बोल्याचे त्यांनी सागितले. मात्र, संप मागे घ्या. विलीनीकरणाची प्रक्रिया एकदोन दिवसांत होणं शक्य नाही. त्याव्यतिरिक्त मुद्यांवरही चर्चा करायला तयार आहे, मात्र संप मागे घ्या. चर्चा करुया, असंही अनील परब म्हणाले.

आजही तोडगा नाहीच; संप मागे घ्या, चर्चा करु- अनिल परब
समीर वानखेडेंचा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातही फर्जीवाडा - नवाब मलिक

पुढे ते म्हणाले की, मी 72 हजार लोकांचं प्रतिनिधीत्व करतोय, असं मी त्यांना म्हणालो. सरकार कोणत्याही कर्मचाऱ्याचं नुकसान करु इच्छित नाही. लोकांना सेवा देण्यासाठी आम्ही बांधिल असल्याने पर्यायी व्यवस्था उभी करावी लागणार आहे. यापेक्षा हा संप ताणवू नका, असं आवाहन मी बैठकीत केले आहे असल्याचे परब म्हणाले. सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेतलेली नसून संवेदनशीलताच दाखवली आहे.

पुढे बोलताना परब म्हणाले की, आंदोलन करणं हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. परंतु कुणाच्या तरी सांगण्यावरुन त्यांनी कसलीही कृती करु नये. जे भडकवत आहेत, ते नुकसान झाल्यावर मदतीला येणार नाहीत. राजकारण करण्यासाठी जे भडकवत आहेत, कामगारांनी त्यांच्यामुळे स्वत:चं नुकसान करु नये. मी कामगारांशी लढा देऊ इच्छित नाही, ते माझेच कामगार आहेत, एसटीचे कामगार आहेत. भावना भडकलेल्या असताना चुकीचं पाऊल उचलू नका असे आवाहन परब यांनी केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.