...तर एका दिवसाला आठ दिवसाचा पगार कापावा लागतो - अनिल परब

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण केले जावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारने वेतनवाढीची घोषणा करत असताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावं असं आवाहन केलं होतं.
...तर एका दिवसाला आठ दिवसाचा पगार कापावा लागतो - अनिल परब
...तर एका दिवसाला आठ दिवसाचा पगार कापावा लागतो - अनिल परबSaam Tv

वैदेही काणेकर

मुंबई; एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण केले जावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारने वेतनवाढीची घोषणा करत असताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावं असं आवाहन केलं होतं. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाची मागणी कायम ठेवत संप सुरुच ठेवला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा अनिल परब (Anil Parab) यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचं आवाहन केलं आहे.

यावेळी ते म्हणाले, मी संध्याकाळी पुन्हा आढावा घेईन किती हजर झाले. कर्मचारी, ST आणि माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हजर होत आहेत. हाय कोर्टाने आम्हाला तस सांगितलं आहे. जे हजर होतील त्यांना संरक्षण (Protection) दिलं जाईल. जर त्यांना कोणी अडवलं तर कारवाई केली जाईल. मूळ वेतनात आम्ही वाढ दिली आहे. राणे काय म्हणतात या वर सरकार चालत नाही संख्या बळावर चालत.

हे देखील पहा -

भूमिका अतिशय स्पष्ट आहे की हायकोर्टाने दिलेली आहे ही अहवाल देणार आहे. तोपर्यंत विलीनीकरण वर्ती आम्हाला देखील चर्चा करता येणार सगळे प्रकारचे प्रयत्न करून मला वाटत लवकरात लवकर संप संपेल. मी सर्वांशी बोलतोय. जे निलंबित झालेले कर्मचारी कामावर सायंकाळ पर्यंत येतील त्यांचं निलंबन रद्द केल जाईल असे आश्वासन परब यांनी दिले.

...तर एका दिवसाला आठ दिवसाचा पगार कापावा लागतो - अनिल परब
शरद पवारांचा फोटो ट्विट करत, MIM खासदारांचा आघाडी सरकारला सवाल

ते पुढे म्हणाले, आम्हाला असं वाटत होतं की त्यांची दोन विषय पगार वाढ (Salary increase) झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट आमचा पगार वेळेवर ती मिळाला पाहिजे. आमच्या नोकरीची शाश्वती राहिली पाहिजे यासाठी शासनाने मान्य केलेले आहे त्यामुळे जो त्यांच्या डोक्यात विलीनीकरणाचा मुद्दा आहे त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे विलीनीकरण करायचं नाही करायचं याच्यावर समितीच्या समोर आहे.

कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करणारच -

जर संप बेकायदेशीर ठरवला तर आमच्याकडे अशी तरतूद आहे की एका दिवसाला आठ दिवसाचा पगार कापावा लागतो आणि कृपया या सगळ्या गोष्टींचा विचार करता राज्य शासनाच्या इच्छा नाहीये की कारवाई वर तुमची संपावर आहे त्याला सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशाप्रमाणे कारवाई करणारच एक दिवस कारवाई हे देखील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीकोनातून योग्य नाहीये आणि म्हणून कृपया आम्हाला असे कुठले कारवाई करायला भाग पाडू नका हे मला काही सांगायचे आहे आपल्या माध्यमातून दररोज करतो तसाच पुन्हा कामगारांनी आव्हान करेन की त्यांनी कामावर हजर व्हावं, असं अनिल परब म्हणाले.

Edited By - Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com