Anil Parab: शिवसेना पक्षप्रमुख पदाला हात लावण्याची कुणाची हिंमत नाही; अनिल परब स्पष्टच बोलले

उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख राहणार असं शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटलं आहे.
Anil Parab
Anil ParabSaam TV

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ उद्या संपत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबाबत काय होणार हे अजून अस्पष्ट आहे. कारण निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षप्रमुख पदाच्या मुदतवाढीबाबत किंवा निवडणूक घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही.  उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख राहणार असं शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाबाबत काय होणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र शिवसेना नेते अनिल परब यांनी मोठ विधान केलं आहे. निवडणुक आयोगासमोर सुरू असलेली सुनावणी ही औपचारिकता असून निकाल काहीही आला तरी उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख असतील, अस ते म्हणाले आहेत.

Anil Parab
Prakash Ambedkar : ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार का? प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'राष्ट्रवादी आणि काँग्रेस...'

निवडणूक आयोगाचा निकाल काहीही लागला तरी ते आमचे शिवसेना पक्षप्रमुख राहतील. कायदेशीर लढाई सुरु आहेत, ती सुरु राहील. मात्र उद्धव ठाकरे यांना आम्ही शिवसैनिक जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख मानतोय तोपर्यंत त्यांच्या पदाला हात लावण्याची कुणाचीही हिंमत नाही, असं अनिल परब यांनी म्हटलं.

Anil Parab
Pune News: 'तुला संपवतोच...', पुण्यात मनसे नेत्यावर गोळीबाराच्या घटनेने खळबळ

मुदत संपणे हा एक तांत्रिक मुद्दा असून आम्ही त्याला जास्त महत्त्व देत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची मुदत संपण्यास आता अवघे काही तास शिल्लक असून निवडणूक आयोगाने त्यांचं पक्ष प्रमुखपद वाढवण्यास मुदतवाढ किंवा निवडणूक घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com