अनिल परबांच्या अडचणी वाढल्या; सलग तिसऱ्या दिवशीही होणार चौकशी

एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
अनिल परबांच्या अडचणी वाढल्या; सलग तिसऱ्या दिवशीही होणार चौकशी
Anil ParabSaam Tv

मुंबई: एकीकडे शिवसेनेत (Shivsena) उभी फुट पडली असताना दुसरीकडे शिवसेनेचे संकटमोचक मानले जाणारे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोन दिवसांपासून परब यांची ईडी चौकशी सुरू आहे, उद्या तिसऱ्या दिवशीही चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना ईडीने (ED) दिल्या आहेत. दापोलीतील साई रिसॉर्ट संदर्भात परब यांची चौकशी करण्यात येत आहे.

मंगळवारीही अनिल परब यांची ईडी चौकशी केली, तसेच आजही त्यांना चौकशी करण्याासाठी बोलवले होते. कालही सलग ९ तास अनिल परब (Anil Parab) यांची चौकशी झाली होती. उद्या परत दापोलीतील साई रिसॉर्ट संदर्भातील कागदपत्रे घेऊन चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Anil Parab
Eknath Shinde LIVE updates: उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला ... शिवसैनिक गहिवरले

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांची चौकशी करण्यात येत आहे. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. खंडणीतील पैसे रिसॉर्टसाठी वापरण्यात आल्याचा करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील : संजय राऊत

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. शिवसेनेकडून (Shivsena) हे बंड मोडीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackreray) यांनी सुद्धा आज आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बंडखोरांना प्रत्युत्तर दिलं. त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता वर्षा बंगला सोडणार असून मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली आहे. यासोबतच आम्ही लढत राहू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे. (Sanjay Raut Latest News)

Anil Parab
वेळ आल्यास बहुमत सिद्ध करू; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील : संजय राऊत

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर संध्याकाळी शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना आणि पर्यायानं महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपली भूमिका मांडल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com