BMC Budget : स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत बीएमसीची सप्तर्षी योजना; जाणून घ्या सविस्तर

यंदाच्या अर्थसंकल्पात स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत 7 योजनांची घोषणा
BMC
BMC Saam TV

BMC budget 2023 News : देशातली सर्वात श्रीमंत महानगर पालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी मांडला.

यंदा मुंबई (Mumbai) महापालिकेने विक्रमी 52 हजार 619 कोटीचं बजेट सादर केलं. महत्त्वाचं म्हणजे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 14 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत बीएमसीने (BMC) सप्तर्षी योजना आखली आहे.

BMC
BMC budget 2023 : मुंबईकरांना दिलासा! कोणतीही करवाढ नाही; बजेट पहिल्यांदा ५० हजारांच्या पार

बीएमसीच्या स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत 7 योजनांची घोषणा

१) शाश्वत आणि स्वच्छ बांधकाम व निष्कासन पद्धती - यामध्ये बांधकामाच्या ठिकाणी धूळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अटी आणि बांधकामाच्या ठिकाणी धूळ कमी करण्यासाठी बांधकाम व्यवसाय करिता मार्गदर्शन तत्वे याचं पालन करावे लागणार

२) रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी उपाय योजना

३) वाहतुकीचे शाश्वत आणि पर्यावरण स्नेही उपाय योजना केली जाणार

BMC
Nandurbar News: आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याने तरुणाची हत्या; धक्कादायक घटनेनं नंदुरबार हादरलं

४) शाश्वत कचरा व्यवस्थापन उपाय योजना राबवली जाणार

५) पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत शहरी प्रकल्प हाती घेतले जाणार

६) प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी देखरेख केली जाणार

७) प्रदूषण कमी करण्यासाठी संपर्क आणि जागरूकता मोहिमा राबवल्या जाणार

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com