Pune News: नवले पुलावर पुन्हा अपघात, कंटेनरची लेन तोडून चारचाकी गाडीला धडक

कंटेनर डिव्हाडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसला. याच ठिकाणी दोन दिवसापूर्वी अपघात झाला होता.
Accident
AccidentSaam TV

>> ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात (Accident) झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच या पुलावर 48 वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. कंटेनरने चारचाकीला गाडीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. कंटेनर डिव्हाडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसला. याच ठिकाणी दोन दिवसापूर्वी अपघात झाला होता. (Pune News)

अपघाताबद्दल कारचालकाने सांगितलं की, कोल्हापूरहून येत असताना पुलावर दुरुस्तीचं काम सुरु होतं. त्यामुळे सर्व गाड्यांची वाहतूक एका बाजूने सुरु होती. त्यावेळी ट्रकने मागून येऊन धडक दिली. ट्रक अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला आहे.

ब्रेक फेल झाल्याने ट्रक अनियंत्रित झाला होता. ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत होतो मात्र ट्रक थांबवण्यात अपयश आल्याने पुढील कारला धडक बसली, अशी माहिती ट्रक चालकाने दिली.

दोन दिवसांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पुण्यात मोठी दुर्घटना घडली होती. नवले पूलावर कंटेनरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता, की यात सुमारे ४८ वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या अपघाताची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com