
Vedanta News : वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रोजेक्ट महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. जवळपास पावणेदोन लाख कोटींचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा धक्का ताजा असतानाच, आता महाराष्ट्राला पुन्हा एक मोठा धक्का बसलाय. महाराष्ट्रातील रायगडमध्ये होणारा तीन हजार कोटींचा बल्क ड्रग पार्क प्रकल्प सुद्धा गुजरातला होणार असल्याची माहिती आहे. (Eknath Shinde News Today)
'या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात ५० हजारापेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार होता. मात्र खोके सरकारमुळे दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात जात आहेत', असा आरोप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला आहे. महाराष्ट्राला हवे असणारे प्रकल्प पळवताहेत आणि नको असलेले प्रकल्प स्थानिकांवर थोपवताहेत, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
'बल्क ड्रगमध्ये सरकार पावणेतीन हजार कोटी गुंतवणूक करणार होती. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने ४० आमदारही तिकडं नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडं नेले. केंद्राबरोबर नीट सांगड घातल्यास सर्व शक्य आहे. पण यांचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रगमुळे ८० हजार रोजगार निघून गेले आहेत. अजून तरूण शांत आहेत पण त्यांचा अंत पाहू नका. बल्क ड्रग पार्कही आपल्याकडून कसा काय गेला? एकही गुंतवणूक केंद्राच्या परवानगी शिवाय येऊ शकत नाही. मग केंद्राला पाठपुरावा करून आम्ही आणले मग यांना का जमत नाही'? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. (Aditya Thackeray Todays News)
'महाराष्ट्रातून बल्क ड्रग पार्क गुजरातला गेलाय हे उद्योग मंत्र्यांना माहिती आहे का? असा सवाल करत ८० हजार आणि ते वेदांता प्रकल्पातून निर्माण होणारे दीड लाख रोजगार गेले त्याला जबाबदार कोण'? असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.
वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला?
चाळीस गद्दारांनी सरकार पाडलं, त्यामुळे फॉक्सकॉन प्रकल्प रखडला. एक लाख रोजगार राज्याच्या बाहेर गेले, याची जबाबदारी कोण घेणार आहे. वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला, याचं उत्तर अद्यापही मिळालं नाही. जेव्हा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात होता, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती दर्शनात व्यस्त होते. आता नवरात्र येणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी गरबा, दांडियासाठी न फिरता थोडेसे लक्ष द्यावे, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.