केतकी चितळेवर कुठे-कुठे दाखल झाले आहेत गुन्हे? वाचा डिटेल्स...

Another case was registered against Actress Ketaki Chitale : नवी मुंबईत तिच्यावर आज (सोमवारी) आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. केतकीविरूद्ध आतापर्यंत १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत.
Another case was registered against Actress Ketaki Chitale; look where the crimes have been registered
Another case was registered against Actress Ketaki Chitale; look where the crimes have been registeredFacebook/@epilepsy.warrior.queen

मुंबंई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही सध्या पोलीस कोठडीत आहे. १४ मे ला शनिवारी ठाणे पोलीसांनी केतकीला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर केतकीला अटक करण्यात आली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे. राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे (Crime) दाखल झाले आहेत. केतकीच्या अडचणींत आणखीन वाढ झाली आहे. नवी मुंबईत तिच्यावर आज (सोमवारी) आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. केतकीविरूद्ध आतापर्यंत १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. ठाणे, अकोला, पवई-मुंबई, गोरेगाव-मुंबई, अमरावती, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा याठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Another case was registered against Actress Ketaki Chitale; The number of crimes is more than 10, look where the crimes have been registered)

केतकीने केलेली आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट -

या पोस्टवरुन आता केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली असून तिच्या विरोधात ठाण्यातील कळवा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता नुसार कलम 500, 501, 505, 153-A अशा कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष/जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल नेटके यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवी मुंबईत केतकी चितळेवर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. नेरुळनंतर आता कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा हा दाखल झाला आहे. केतकी चितळेला नवी मुंबई पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या किरण इनामदारवरही पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. किरण इनामदार फरार असून पोलीस त्याच्या शोध घेत आहेत.

केतकी चितळेवर पहिला गुन्हा (१४ मे २०२२)

केतकी चितळेवर पहिला गुन्हा ठाण्यातील कळवा पोलिस स्थानकात दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड संहिता नुसार कलम 500, 501, 505, 153-A अशा कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष/जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल नेटके यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

केतकी चितळेवर दुसरा गुन्हा (१४ मे २०२२)

केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्यावर पुण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. ५००/ ५०१/१५३अ/५०५ २९५अ या कलमान्वये केतकी चितळेसह ही मुळ पोस्ट लिहील्याचा आरोप असलेल्या वकील नितीन भावे आणि निखील भामरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.

केतकी चितळेवर तिसरा गुन्हा (१५ मे २०२२)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण महिला अध्यक्ष संगीता ठाकरे यांनी केतकी चितळी वर भारतीय दंड संहितेनुसार कलम ५०० आणि कलम ५०१ नूसार गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील हाेती. या तक्रारीची शहनिशा करुनल(रविवार) गाडगेनगर पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरुद्ध कलम ५०० आणि ५०१ नूसार दाखल केल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

केतकी चितळेवर चौथा गुन्हा (खदान पोलीस ठाणे, अकोला)

अकोल्यात राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी केतकीच्या कृत्यावर टीका केली. तर राष्ट्रवादी युवती कांग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पना गवारगुरु यांनी खदान पोलिसांत तक्रार देत तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे. सद्यस्थित खदान पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत, अधिक तपास खदान पोलीस करत आहे.

केतकी चितळेवर पाचवा गुन्हा (उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे)

केतकी चितळेच्या विरोधात उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात रोहित बागल यांनी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनंतर केतकी चितळेच्या विरोधात भादवी १८६० कलम ५०५(२) ५००, ५०१, १५३-अ या द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी केतकी चितळेला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केतकी चितळेवर सहावा गुन्हा (नेरुळ पोलीस ठाणे)

केतकी चितळे हिच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुमीत्रा पवार यांनी केला असून,१५३A,५००,५०१,५०५(२), अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. याची पुढील कारवाई नेरूळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करणार आहेत.

केतकी चितळेवर सातवा गुन्हा (पारनेर पोलीस ठाणे)

पारनेर येथे केतकी वर गुन्हा दाखल झाला असून शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी फिर्याद दिली आहे. शरद पवार यांच्याबद्दल सोशल नेटवर्किंगवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देणारी अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल झाला असून पारनेर पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घ्यावे अशी मागणी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी केली आहे.

Another case was registered against Actress Ketaki Chitale; look where the crimes have been registered
Ketaki Chitale Latest Update: अभिनेत्री केतकी चितळेवर शाईफेक करणाऱ्यांवर गुन्हा

याशिवाय केतकीवर खीललप्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत

१) खदान पोलीस ठाणे, अकोला
२) पवई पोलीस ठाणे, मुंबई
३) गोरेगाव पोलीस ठाणे, मुंबई
४) गाडगे नगर पोलीस ठाणे, अमरावती
५) नाशिक सायबर पोलिस ठाणे
६) कळवा
७) पुणे
८) पिंपरी-चिंचवड
९) धुळे
१०) सिंधुदुर्ग

११) पारनेर

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com