"समीर वानखेडेंचा आणखी एक फर्जीवाडा केंद्र" - नवाब मलिकांचा आणखी एक गंभीर आरोप...

आज सकाळी एक ट्विट करत नवाब मलिकांनी एका रेस्टो बारचा फोटो शेयर केला आहे. ज्याला त्यांनी "Sameer Dawood Wankhede का एक और है यह फर्जीवाड़ा केंद्र" असं कॅप्शन दिलं आहे.
"समीर वानखेडेंचा आणखी एक फर्जीवाडा केंद्र" - नवाब मलिकांचा आणखी एक गंभीर आरोप...
"समीर वानखेडेंचा आणखी एक फर्जीवाडा केंद्र" - नवाब मलिकांचा आणखी एक गंभीर आरोप...Saam Tv

मुंबई: एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सातत्याने वानखेडेंवर गंभीर आरोप करतायत. आज सकाळी आणखी एक ट्विट करत नवाब मलिकांनी एका रेस्टो बारचा फोटो शेयर केला आहे. ज्याला त्यांनी "Sameer Dawood Wankhede का एक और है यह फर्जीवाड़ा केंद्र" असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे ते आज नेमका काय आरोप करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. ("Another forgery center of Sameer Wankhede" - Another serious allegation of Nawab Malik)

हे देखील पहा -

नवाब मलिकांच्या अनेक आरोपांनंतर समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणातून हटविण्यात आले होते. त्यानंतर मलिकांनी वानखेडेंचे दोन विवाह प्रकरणे बाहेर काढली. आता त्यांनी समीर वानखेडेंच्या जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप केल्यानंतर वानखेडेंच्या सर्व कागदपत्रांची चौकशी होणार आहे. (Nawab Malik Vs Sameer Wankhede) त्यात आता मलिकांनी या नव्या ट्विट केलेल्या फोटोमुळे वानखेडेंच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे.

"समीर वानखेडेंचा आणखी एक फर्जीवाडा केंद्र" - नवाब मलिकांचा आणखी एक गंभीर आरोप...
NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणींत वाढ; SIT द्वारे कागदपत्रांची तपासणी होणार!

मलिकांनी शेयर केलेल्या फोटोमधील या रेस्टो बारचा वानखेडेंसोबत काय संबंध आहे. हे रेस्टो बार वानखेडेंच्या मालकिचे आहे का असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. या सर्व प्रकरणावर नवाब मलिक आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देणा आहेत. त्यामुळे मलिक वानखेडेंवर कोणते आरोप करतात हे पाहणं गरजेचं आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com