मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई; गुजरातमधून तब्बल १ हजार कोटींचा MD साठा जप्त

मुंबईच्या (Mumbai) अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाने कारवाई करत १४०३ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे.
mumbai crime news
mumbai crime news saam tv

Mumbai Crime News : मुंबईच्या (Mumbai) अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाने कारवाई करत १४०३ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. अंमली पदार्थाचा साठा गुजरात राज्याच्या भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर तालुक्यातून जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ७ जणांना अटक केली आहे.

mumbai crime news
Solapur Crime News : आईवर कुर्‍हाडीने वार; मुलानं बापास मारलं ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मुंबईच्या गोवंडीभागातून ४ आरोपींकडून काही किलो एमडी ड्रग्ज (अंमली पदार्थ) जप्त केले. या प्रकरणात पुढे पाचव्या आरोपीकडून तब्बल ७०१ किलोपेक्षा अधिक वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत रु. १४०३ कोटी आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाने कारवाई करत आरोपींकडून अंमली पदार्थ जप्त केले आहे.

mumbai crime news
चुंबकीय शक्तीने तांदूळ खेचून घेणाऱ्या भांड्यांच्या नावाखाली गंडवलं; निलंबित पोलिस गजाआड

गुजरात राज्यातील भरूच जिल्हयातील अंकलेश्वर तालुक्यातील एका कंपनीत सदर अंमली पदार्थ हे ५ व्या आरोपीने बनविला असल्याचे निष्पन्न झाल्याचे अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या तपासात उघड झाले आहे.

६ व्या आरोपींकडून ९० लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मोठी कारवाई करत गुजरातमध्ये अंमली पदार्थ बनवणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकला. या कक्षाने छापा टाकून अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ जप्त केले आहे.

mumbai crime news
Crime: अंबरनाथमध्ये भररस्त्यात तरुणाला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी विभागाने गुजरातमधून आणखी काही आरोपींना देखील अटक केली आहे. अशा प्रकारे अंमली पदार्थाची निर्मिती व व्यापार करणारे आंतरराज्यीय मोठे रॅकेट अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटने उध्वस्त केले आहे. तसेच या प्रकरणात अंमली पदार्थ तयार करून आरोपीने आणखी कोणा-कोणाला विकला आहे याबाबतचा अधिक तपास करण्यात येत आहे, असेही पोलिसांनी सांगितलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com