सतर्क रहा; बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्व समितीचे गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना आवाहन!

मुंबईमध्ये आजपासून चार दिवस मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा इशारा
सतर्क रहा; बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्व समितीचे गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना आवाहन!
सतर्क रहा; बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्व समितीचे गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना आवाहन!SaamTV

रश्मी पुराणीक

मुंबई : मुंबईमध्ये आजपासून चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून (Meteorological Department) देण्यात आला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबईमधील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे, गणेश मंडपांमध्ये शॉर्ट सर्किट होऊ नये यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्व समनव्य समिती कडून गणपती मंडळाना करण्यात आलं आहे. (Appeal to Ganesh Mandals in Mumbai)

हे देखील पहा-

मागील काही दिवसांपासून राज्यभर पाऊस (Rain) सुरु आहे अशातच आता हवामान विभागाने देलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत चार दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे सध्या सुरु असणारा गणेशोत्सवाचा काळ पाहता अनेक मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते आणि पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे मंडळांमध्ये शॉर्ट सर्किट (Short circuit) होण्याची शक्यता असते त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्त्यांनी सर्तक रहाण्याच्या सुचना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून करण्यात देण्यात आल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com