Video : Badlapur Local मध्ये डाऊन आलेल्या प्रवाशांचा हायवोल्टेज ड्रामा! वादाचं कारण काय?

आज सकाळी ९ वाजून २९ मिनिटांच्या बदलापूर सीएसएमटी लोकलमध्ये दोन गटांत मोठा वाद झाला आहे.
Badlapur Local
Badlapur LocalSaam TV

Badlapur Train Viral Video: बदलापूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आज सकाळी ९ वाजून २९ मिनिटांच्या बदलापूर सीएसएमटी लोकलमध्ये दोन गटांत मोठा वाद झाला आहे. हा वाद सीट मिळवण्यासाठी झाल्याची माहिती समोर आली आहे. या भांडणाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Badlapur Local Train News)

अंबरनाथकर आणि बदलापूरकरांचा हा वाद डाऊन करून मिळवलेल्या सीटवरून झाला आहे. अंबरनाथमधील नागरिक बदलापूरमधून सुटणाऱ्या ट्रेनला डाऊन मारतात. त्यामुळे बदलापूरच्या नागरिकांचा खोळंबा होतो. ठाणे, घाटकोपर येई पर्यंत त्यांना उभ्याने प्रवास करावा लागतो. असे बदलापूरच्या प्रवाशांचे म्हणने आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, बदलापूर ट्रेन असून देखील अंबरनाथकर जागेवर मुजोरपने आपला अधिकार दाखवत आहेत.

डाऊन करणे हा काय प्रकार?

बदलापूरमध्ये रेल्वे सेवा लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहेत. सकाळी कामाच्या गडबडीत फास्ट ट्रेन सुटल्यावर थेट अर्ध्यातासाने दुसरी ट्रेन येते. अशात ट्रेन आल्यावर बदलापूर ते ठाणे, घाटकोपर किंवा सीएसटी असा लांबचा प्रवास करणाऱ्या व्यक्ती सीट मिळवण्यासाठी धडपडतात. मात्र बदलापूरमधून सुटणाऱ्या लोकल ट्रेन देखील अंबरनाथमधून प्रवाशांनी भरून येतात. म्हणजेच डाऊन करून येतात.

Badlapur Local
Badlapur Crime News: बदलापूरमध्ये धक्कादायक घटना; कचरा वेचणाऱ्या मुलाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

यामळे बदलापूरकरांना तासंतास ट्रेनमध्ये उभ्याने प्रवास करावा लागतो. अंबरनाथमधील नागरिकांचे डाऊन मारणे आता खूप जास्त प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी ९ वाजून २९ मिनिटांच्या बदलापूर सीएसएमटी लोकलमध्ये मोठा वाद झाला. यानंतर आता रेल्वे पोलीस आणि प्रशासनाने उलटे बसून येणाऱ्या या प्रवाशांवर कारवाई करावी, अन्यथा पुन्हा एकदा स्टेशन मास्तरांना घेराव घालू, असा इशारा बदलापूरच्या (Badlapur) प्रवाशांनी दिला आहे.

Badlapur Local
Badlapur News: मित्राकडे उसने पैसे परत मागितले अन् घात झाला; घरात घुसून केली हत्या

प्रत्येक मुंबईकर (Mumbai) जीव मुठीत घेऊन रेल्वेने प्रवास करत असतो. या प्रवासात गर्दी जास्त आणि ट्रेनची सुविधा कमी असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ट्रेन पकडण्यापासून ते सीट मिळवण्यापर्यंत प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. अशात बदलापूर लोकल ट्रेनमध्ये अनेक अंबरनाथकर डाऊन करतात. याच त्रासामुळे आज दोन प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली आहे. सध्या सोशल मीडियावर डाऊन करून आलेल्या प्रवाशांच्या भांडणाचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com