Pune: तृतीयपंथीयांची पार्टी सुरू असताना हॉटेलमध्ये राडा, तरुणाचा मृत्यू

अभयने स्वतःचा जीव वाचविण्याकरिता बारच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली यात तो गंभीर जखमी झाला.
Crime News In Pune
Crime News In PuneSaam TV

पुणे : २५ जुलैला पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील भुजबळ चौक येथील बार हिस्ट हॉटेलमध्ये रात्री दोन वाजताच्या जवळपास तृतीयपंथीयांची एक पार्टी सुरू होती. ही पार्टी सुरू असताना त्या ठिकाणी मोठं भांडण झालं.

या भांडणात अभय गोडाणे या युवकाला मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली होती. मारहाण झाल्यामुळे अभयने स्वतःचा जीव वाचविण्याकरिता बारच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली यात तो गंभीर जखमी झाला.

पाहा व्हिडीओ -

मात्र, उपचारादरम्यान अभयचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणात वाकड पोलिसांनी (Wakad Police) मनोज कुमार बापूसो गोईलकर यांच्या फिर्यादीवरून बारचे मालक, चालक, बाउन्सर, बार टेंडर आणि डीजे मॅनेजर यांच्याविरोधात मारहाण करून मृत्यूस कारणीभूत ठरविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पाच सहा जणांना अटक केली असून पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com