Mumbai: मंदाकिनी खडसेंविरोधात अटक वॉरंट... (पहा व्हिडिओ)
Mumbai: मंदाकिनी खडसेंविरोधात अटक वॉरंट... (पहा व्हिडिओ)Saam Tv

Mumbai: मंदाकिनी खडसेंविरोधात अटक वॉरंट... (पहा व्हिडिओ)

जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी आरोपी असून, त्यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अटक वाॅरंट जारी

पुणे : जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी आरोपी असून, त्यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अटक वाॅरंट जारी केला आहे. मंदाकिनी खडसें तर्फे अटक पूर्व जामिन अर्ज दाखल केला गेला होता. मात्र, सत्र न्यायालयाने सदर अर्ज फेटाळला आहे. याच प्रकरणात एकनाथ खडसे हे आज ही सत्र न्यायलयात हजर होऊ शकले नाहीत.

पहा व्हिडिओ-

सध्या खडसेंची सर्ज़री झाली असून, ते सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भर्ती झाले आहेत. अजूनही काही दिवस ते रुग्णालयातच राहणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले आहे. हजर राहण्यासाठी आणखीन वेळ मागितला आहे. न्यायलयाच्या तर्फे खडसे यांना उपस्थित राहण्यासाठी वेळ दिला गेला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 21 ऑक्टोबर या दिवशी होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.